अमळनेर: दिनांक १०-०४-२०२४ सकाळी ११.०० वा. ०३ जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत ०१५ अमळनेर विधानसभा मतदार संघामध्ये सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षते खाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत आचार संहितेचा अंमल लागु असल्याने आचार संहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेऊन व कोणत्याही धर्माच्या भावना न दुखवता बैठक आयोजीत करण्यात आली. यात शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या सुचनांचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे व पोलीस उप अधिक्षक सुनील नंदवाळकर यांनी निरसन केले. संवेदनशिल मतदान केंद्र तसेच आगामी सण आणि उत्सव यासह सखाराम महाराज यात्रा शांततेत पार पाडण्याबद्दल पोलीस व महसूल व नगरपालीका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले.
सदर बैठकीस पोलीस उप अधिक्षक सुनील नंदवाळकर रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर, तुषार नेरकर मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर, श्री. विकास देवरे पोलिस निरीक्षक अमळनेर पो.स्टे., शांतता समितीची सदस्य व पत्रकार उपस्थित होते. तसेच सुत्रसंचालन संजय कृष्णा पाटील यांनी केले.