जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची २५ एप्रिल पर्यंत विशेष मोहिम

गुगल फोटो

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार

जळगाव दि.१० : जळगांव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगांव अंतर्गत दि.१० एप्रिल ते २५ एप्रिल,२०२४ या कालावधीत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता वर्ग १२ वी विज्ञान शाखेतील सर्व प्रवेशीत मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे पडताळणीचे प्रकरणे तालुका व महाविद्यालयांतून माहिती, समान संधी केंद्रांच्य माध्यमातून जिल्हास्तरावर संकलित करणार आहे.
समान संधी केंद्रांच्या माध्यमातून सीईटी देणारे विद्यार्थी, डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल व अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणी बाबत केंद्रांमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच समान संधी केंद्रांच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करून तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हयातील विज्ञान शाखेतील व सीईटी परिक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपुर्ण अर्ज सादर करून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन.एस.रायते यांनी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]