श्रीमती डि.आर.कन्या शाळेत मराठी नववर्षानिमित्त स्वहस्त गुढी निर्मिती व प्रदर्शन

अमळनेर दि. ८ एप्रिल: येथील डि. आर. कन्या शाळेत मराठी नवीन वर्षानिमित्त स्वहस्त गुढी निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी विद्यार्थिनींनी घरातील टाकाऊ वस्तू त्यात कापड, लाकडी दांडा, रंगीत पेपर,डिंक, मणी असे साहित्य आणले होते. करुणा व कार्यानुभ शिक्षक डि.एन. पालवे यांनी गुढी बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यावेळी शाळेतील तीनशेच्यावर विद्यार्थ्यांनिंनी गुढी बनविल्या.स्वहस्त निर्मित गुढी प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस.बी.निकम,पर्यवेक्षक श्रीमती.एस.पी.बाविस्कर,व्ही.एम.पाटील, यांनी उद्घाटन केले. शाळेतील सर्व विद्यार्थीनिंनी प्रदर्शन पाहिले. त्यावेळी क्रीडा विभागाचे जे.व्ही.बाविस्कर यांनी शिस्त सांभाळली.सदर उपक्रमात शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षककेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]