मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे खुली मॅरेथॉन स्पर्धा

अमळनेर : भारत निवडणूक आयोगाच्या मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत अमळनेर उपविभागातर्फे २ एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान व्हावे यादृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. १८ वर्षे वयावरील सर्व पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. २ रोजी सकाळी साडे सात वाजता जिल्हापरिषद शासकीय विश्रामगृहापासून स्पर्धेला सुरुवात होऊन धुळे रोडवरील प्रवेशद्वारावर स्पर्धा संपेल. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला अंतिम रेषेच्या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच पुरुष व महिला स्पर्धकांना पहिल्या तीन क्रमांकाना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]