अमळनेर : दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. विद्याविहार कॉलनीतील बाल गोपालांनी अत्यंत छान असं नियोजन करून होळी सण हा उत्साहात साजरा केला..
शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी.’ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.
विद्या विहार कॉलनीतील गट नंबर 14 30 मधील सर्व बालगोपालांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षाची होळी खूप धुमधडाक्यात साजरी केली.. यावेळी आजूबाजूतील कॉलनीतील सर्व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी होळीचे पूजन करण्यात आले.. सर्व बंधू-भगिनींनी नमस्कार केला..
नंतर सर्व सर्वांना गुळाची जिलबीचा प्रसाद वाटप करण्यात आला..
होळीची यांनी केली तयारी..
आर्यन जाधव,तन्मय शिंगाणे,श्रेयस माळी,प्रथमेश पवार, प्रथमेश जाधव, प्रथमेश निफाडकर, हर्ष येवले, गौरव पाटील, निखिल पाटील,गणेश पाटील निल चौधरी,कौस्तुभ निफाळकर,प्रथम पाटील,देवेंद्र चौधरी, चेतन चौधरी, तेजस पाटील, ग्रंथ पवार, उदय पाटील, मितेश जाधव,हिंमाशु गोसावी, धर्मांशु बोरसे,
तनु शेलकर, प्रणाली पवार, खुशी सुर्यवंशी, आराध्या पाटील,सह बालगोपालांनी होळीची तयारी केली..
यांची होती उपस्थिती
तर यावेळी विद्या विहार कॉलनीतील मिलिंद संदानशिव,नारायण शिंगाणे, ईश्वर महाजन, प्रवीण गोसावी ,जे पी पवार, विकास शेलकर, प्रमोद पवार, शांताराम पाटील, आर डी शिंदे सर,संजय चौधरी, आबा चौधरी, संजय पाटील, सुनिल शिंगाणेसह अनेक बांधव उपस्थित होते..