लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत मंत्री अनिल पाटील यांचा समावेश

अमळनेर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्र राज्यासाठी जाहीरनामा समिती जाहीर केली असुन त्यात त्यांनी मंत्री पाटील यांचा समावेश केला आहे.सदर जाहिरनामा समितीत अध्यक्षपदी ना.दिलीप वळसे पाटील,सदस्यपदी ना. धनंजय मुंडे,ना. अनिल भाईदास पाटील,नरहरी झिरवळ,ना. कु. अदितीताई तटकरे,आ. डॉ. राजेंद्र शिंगणे,बाबा सिद्दीकी,अविनाश आदिक,समीर भुजबळ,श्रीमती रुपाली चाकणकर यासह इतरांचा समावेश आहे.दरम्यान नामदार अनिल पाटील हे कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यभर प्रकाशझोतात आले असताना पक्ष संघटनेत देखील ते क्रियाशील असल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होऊ लागला असून अनेक महत्त्वाच्या जवाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *