
अमळनेर ( प्रतिनिधी) तालुक्यातील सडावण बु|| जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अमळनेर मतदार संघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात चिमुकल्या मुलांचे कौतुक करत शाळेत मला पूर्ण गाव दिसते असा गौरव केला व मुलांना प्रोत्साहनपर रोख बक्षीस दिले. तसेच सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित देऊन मुलांचे कौतुक केले व मार्गदर्शनपर भाषण केले.यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थित गावकरी, मान्यवर ,पालक यांची मने जिंकली. शाळेतील पहिली ते सातवी पर्यंत मुलांनी एकापेक्षा एक अशा हिंदी ,मराठी ,अहिराणी, देशभक्तीपर व आदिवासी गीत सादर करून लोकांचे प्रबोधन व मनोरंजन केले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी, ग्रामस्थांनी, पालकांनी बालकलाकारांचे कौतुक करून रोख बक्षीस दिले. कार्यक्रमास गावातील लोकनियुक्त सरपंच राजीव कुमार पाटील, उपसरपंच दिनानाथ पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य,माजी उपसरपंच गुलाब पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज पाटील, सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य ,सर्व पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी ,सर्व बचत गट, आरोग्य कर्मचारी, गावातील तरुण मित्र मंडळ, विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक ,विद्यार्थी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे व सुनील मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापिका सरला बाविस्कर ,राजेश साळुंखे, श्यामकांत बागड, मनीषा पाटील ,मेघा सोनवणे यांनी परिश्रम घेतले. सुखदेव पाटील योगेश पाटील ,अंकुश बिऱ्हाडे व इतर युवक यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. निळकंठ दादा यांनी साऊंड सिस्टिम व लाईटची व्यवस्था केली. कार्यक्रमाचे आभार सुनील मोरे यांनी मानले.
