अनेक प्रभागात साकारणार नवीन रस्ते व विविध विकासकामे
अमळनेर: लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास वपाटील यांनी अजून एक षटकार मारत अमळनेर शहरास तब्बल 15 कोटींच्या विकास कामांची अनमोल भेट दिली असून या निधीतून अनेक प्रभागात नवीन ट्रीमिक्स रस्ते यासह विविध विकासकामे साकारणार आहेत.
अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून ही विकासकामे होणार असून याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सुविधा व सेवा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन आदेश दि 15 मार्च रोजी प्रसिद्ध झाला असून यात अमळनेर शहरात 31 विकासकामांसाठी 15 कोटी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.या निधीतून अनेक भागांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून उर्वरित कामे लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितपणे मंजूर होऊन कोणत्याही परिसरात रस्ते किंवा इतर सुविधांचा अभाव राहणार नाही अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली आहे.एकंदरीत ग्रामिण भागापाठोपाठ शहराचाही उत्तम विकास साधला जात असून मंत्र्यांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
15 कोटी निधीतून या भागात होणार विकासकामे,,अमळनेर न.प. हद्दीतील तिरंगा चौक ते झामी चौक पर्यंत रस्ता
काँक्रीटीकरण व डांबरीकारण करणे रक्कम 2 कोटी,न्यु प्लॉट भागात रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे रक्कम 75 लक्ष,विद्यानगर व राधाकृष्ण नगर भागातील रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 65 लक्ष, प्रभाग क्र.०८ मध्ये मधुकर शुक्ल ते उत्कर्ष नगर रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम 75 लक्ष, सुरभी कॉलनी मध्ये गट क्र.१४३२ योगा हॉल बांधकाम करणे रक्कम 40 लक्ष, तांबेपुरा भागात गायत्री नगर, वैभव नगर येथे रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 80 लक्ष, विविध भागात ओपन जीम साहीत्य बसविणे रक्कम 50 लक्ष, वैभव नगर भागातील रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम 25 लक्ष, प्रभाग क्र.०१ मध्ये केशव नगर भागात रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 50 लक्ष, भालेराव नगर मध्ये गट क्र. १३९० खुला भुखंड सुभोभिकरण करणे रक्कम 30 लक्ष, गणेश कॉलनी मध्ये गट क्र. ३७४१ खुला भुखंड सुभोभिकरण करणे रक्कम 30 लक्ष, ढेकू रोडवर महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे रक्कम 20 लक्ष,साने नगर भागात काँक्रीटीकरण करणे रक्कम 30 लक्ष, अमलेश्वर नगर भागात काँक्रीटीकरण करणे रक्कम 40 लक्ष, प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाटीलगढी परिसरातील रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 50 लक्ष, सिटी सर्वे न. ३२२३ मध्ये योगा हॉल बांधकाम करणे रक्कम 50 लक्ष,प्रभाग क्र. ०७ गुलमोहर कॉलनी मध्ये गट क्र. २३९/१/२/३ खुला भुखंड विकसीत करणे 40 लक्ष, शिव कॉलनी भागात रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 50 लक्ष, सप्तश्रृंगी कॉलनी भागात रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे 30 लक्ष, शिव कॉलनी भागात गट क्र. १४५८ खुला भुखंड विकसीत करणे रक्कम 40 लक्ष, प्रभाग क्र. १६ व १७ मध्ये भागात रस्ते काँक्रीटीकरण व चेकर्स बसविणे रक्कम 50 लक्ष, गुंजाळ आप्पा यांच्या घरापासून ते एस.ओ. पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 20 लक्ष,पानखिडकी भागात पुरुष व महिला स्वछता गृह बांधकाम करणे व रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम 30 लक्ष, पानखिडकी भागात रस्ते काँक्रीटीकरण व चेकर्स बसविणे व सुशोभीकरण करणे रक्कम 20 लक्ष, प्रभाग क्र. ६ मध्ये सिटी सर्वे न. २१९ मध्ये योगा हॉल बांधकाम करणे रक्कम 40 लक्ष, प्रभाग क्रमांक ७ मध्ये लक्ष्मी नगर परिसरातील रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 1 कोटी, प्रभाग क्र. १४ मध्ये गुरुकृपा कॉलनी भागात रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे रक्कम 50 लक्ष, ढेकू रोडवर विश्वकर्मा मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसविणे रक्कम 20 लक्ष, गट क्र. ४१७ खुला भुखंड विकसीत करणे 40 लक्ष , प्रभाग क्र.१५ मध्ये गट क्र. १४३८ व १४४१ मध्ये योगा हॉल बांधकाम करणे रक्कम 30 लक्ष , प्रभाग क्र.१७ मध्ये रुपजी नगर भागात रस्ते ट्रिमीक्स काँक्रीटीकरण करणे व गटार बांधकाम करणे रक्कम 30 लक्ष अशी एकूण 15 कोटींची कामे होणार आहेत. सदर भरघोस निधीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.