बडगुजर समाज पंच मंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार

ज्या घरामध्ये ज्येष्ठ लोक असतात ते घराला दिशा देण्याचे काम करतात, म्हणजे जिथे दिशा मिळाली की तिथे माणसाची दशा सुधारते.डी.वाय.एस.पी.- सुनील नंदवाळकर साहेब

अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते.

अमळनेर: रविवार दिनांक १०/ ०३/२०२४ रोजी बडगुजर समाज मंगल कार्यालय अमळनेर येथे बडगुजर समाज कार्यकारणी द्वारा समाजातील पदोन्नती धारक, ०१ जानेवारी २०२० नंतर सेवानिवृत्त झालेले बंधू -भगिनी आणि वयाची ७५ वर्ष पार केलेले भाग्यवान मातृ पितृ तुल्य समाजातील जेष्ठ समाज बांधव माता भगिनी, तसेच विशेष सत्कार मा.सुनीलजी नंदवाडकर साहेब
डी.वाय.एस.पी अमळनेर यांच्या सत्कार बडगुजर समाज पंच मंडळ व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ आण्णासाहेब श्री माधवराव बाबुराव शेठ बडगुजर होते तसेच व्यासपीठावर सन्माननीय अतिथी ताईसाहेब सौ.जयश्री अनिल पाटील ( जि.प.सदस्या, अध्यक्ष सं.गा.नि.यो.अमळनेर), मा.श्री.सुनिल नंदवाळकर साहेब डीवायएसपी अमळनेर, सौ स्वप्ना विक्रांत पाटील, सरिता नारायणशेठ जाधव (ग्रेडेड मुख्याध्यापिका).,मा.श्री.शरद पाटील( सिनियर इंजिनिअर) मा.श्री.भाऊसो. महेंद्र सुधाम महाजन ( उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते),मा.श्री.संजय सुदाम चौधरी ( मा . प्रशासन अधिकारी न.पा अमळनेर), मा.श्री प्रकाश लांडगे ( सेवानिवृत्त पर्यवेक्षक खा.शि.मंडळ) मा.श्री.डाॅ.विशाल. आर. बडगुजर ( बालरोग तज्ज्ञ) , सौ.मनिषा विशाल बडगुजर ,मा.श्री आबासाहेब प्रवीण पुंडलिक शेठ बडगुजर उपस्थित होते . ताईसाहेब सौ जयश्री पाटील यांनी आपले बडगुजर समाजशी निगडित नाते असून मंडळाने आयोजित केलेल्या आजच्या सन्मान सत्कार सोहळ्याचे कौतुक करून आभार मानले तसेच मा.श्री.डि वाय एस पी . सुनील नंदवाळकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की,
बडगुजर समाजात वधुवर मेळावा आयोजित केला जातो तेव्हा फक्त शिकलेल्या मुली आणि मुलांच्या याद्या, पुस्तके तयार होतात आणि त्यांच्या व्दारे फक्त शिक्षितांचे माहिती आदानप्रदान होते.पण कमी शिकलेली व अक्षित सहभाग नोंदविण्यासाठीपुढे येत नाहीत.कुटुंबात संभाषण, संवाद जास्त साधला जात नाही.तरुण मुले,मुली मोबाईल फोन मध्ये अडकले आहेत बहुतेक रात्री दोन ते पाच वाजेच्या सुमारास संपर्कात जास्त प्रमाणात राहून घरच्या मंडळींना अंधारात ठेवतात आणि प्रेम संबंधांमुळे मुली पलायन करण्यात यशस्वी होतात.यासाठी आई.वडीलांनी लक्ष ठेऊन सुसंवाद साधून योग्य असे मार्गदर्शन केले पाहिजे. तरी देखील आज असे दिसते की घरातील लोकांशी संवाद साधने बंद झालेले आहे मुलगा बापाशी बोलत नाही सून सासुशी बोलत नाही यामुळे घरातील ज्येष्ठांमध्ये निराशा निर्माण होते तरी असे न करता संवाद साधला पाहिजे .
म्हणून कुटुंबात वयस्कर व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे असतात.वृध्दांची आज्ञा परिवाराने पाळायला पाहिजे..
तसेच आपण आपल्या घरातील जेष्ठाकडून संस्कार शिकले पाहिजे , ज्या घरांमध्ये जेष्ठ लोक असतात ते घराला दिशा देण्याचं काम करतात म्हणजे जिथे दिशा मिळाली कि माणसाची दशा सुधारते.

आयुष्यात कष्टाने जिवन जगताना झालेल्या यातनातून मिळणारा अनुभव वडीलधाऱ्यांना असतो.
आज समाजाला गरज आहे ती म्हणजे मुले,मुली कोण कोणत्या वर्गात, कोणत्या विभागात शिक्षण घेत आहेत त्यांचा सर्वे केला पाहिजे त्यासाठी योग्य दिशा दिली पाहिजे तरच समाजाची प्रगती साधली जाईल.आज अमळनेर येथील बडगुजर समाज पंच मंडळ यांनी आयोजित केलेल्या नाबाद ७५ वर्ष असणारे समाजातील ज्येष्ठांचा सत्कार म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला आहे.तसेच पदोन्नती व सेवा निवृतांचा सत्कार करून त्यांना उर्जा दिली आहे अशा कार्यक्रमांचे आयोजन करणारे बडगुजर समाज पंच मंडळ यांचे मनापासून आभार मानले.

तसेच जयश्री ताई अनिल पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले की,
ज्येष्ठांना माया व प्रेमाची अपेक्षा कुटुंबीयांनी पूर्ण करणे अपेक्षित असतानाच परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम, व्यस्तता व सामाजिक कामे हे चार मुद्दे ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरतात. अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते.

एकत्र जेवण, पुरेसा संवाद व काळजी घेण्याची कुटुंबातील सदस्यांची सवय त्यांना आधार देणारी ठरते. एकलकोंडेपणाने नैराश्‍य वाढते. पण घरातील सर्व सदस्य धावपळीत असले तरी त्यांनी साधलेला संवाद, विचारपूस त्यांना कायम ऊर्जा देणारी ठरते. स्वतःला व्यस्त ठेवणे अत्यंत आवश्‍यक बाब ठरते. त्यामध्ये सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज वृद्धापकाळात असते. याशिवाय समवयस्क मित्रासोबत गप्पाटप्पादेखील तेवढ्याच आनंददायी ठरतात. ही व्यस्तता शारीरिक व्यायाम घडवून आणते तसेच मनाला कामांत गुंतवून ठेवते. कुटुंबासोबत व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची तयारी असणेदेखील आवश्‍यक असते. मनाचा उत्साह भरपूर असला तरी शरीर साथ देत नाही. तेव्हा ही स्थिती समजून घेत परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे.

अनेकवेळा या वयात आजारपणाचा त्रासदेखील होऊ शकतो. तो सहन करून त्यावरचे उपाय करून घेताना धैर्य कायम ठेवण्याची गरज आहे. कुटुंब व समाजाकडून अधिकच्या अपेक्षा बाळगल्या तर अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येऊ शकते. तसेच गरजेपुरता व्यायाम केल्यास अन्न पचवणे व शरीर निरोगी राहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.
कुटुंबात नातवंडांना चांगल्या पद्धतीने सांभाळावे. त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम ज्येष्ठांनी केले पाहिजे. भजन व भक्तीच्या माध्यमातून वेळ घालवावा. कमी आहार असावा. शांत राहून स्वतःचे मन आनंदी ठेवून त्याला कामात गुंतवावे. थोडा आधी काळापासून व्यायामाची सवय असेल तर ती पुढे वृद्धापकाळात उपयोगात येते.

सदर प्रसंगी पदोन्नती धारक श्री विजय संतोष शेठ बडगुजर (वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी) यांनी अमळनेर येथे सुरू असलेल्या कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेच्या मंदिर बांधकामासाठी ५०००/- पांच हजार रुपयाचा चेक देत कार्यकारिणी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.आजच्या अशा हर्षित सोहळ्यात सुमारे ४० जेष्ठ मातृ पितृ तुल्य आणि आलेले पदोन्नती धारक व सेवानिवृत्त सर्व समाज बंधू भगिनींचा सन्मान सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अती उत्साहात करण्यात आला . कार्यक्रमाचे धडाकेबाज सूत्रसंचालन मा श्री किरण शांताराम शेठ बडगुजर सर यांनी केले.आणि सन्मान सत्कार सोहळा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री प्रवीण पुंडलिक शेठ बडगुजर , श्री जगन्नाथ शेनपडू शेठ बडगुजर, श्री किरण बडगुजर सर, विजय बन्सीलाल शेठ बडगुजर, घनश्याम मांडळकर, किरण खेमचंद शेठ बडगुजर, कैलास महादु शेठ बडगुजर, प्रभाकर सुखदेव शेठ बडगुजर, अशोक राजधरशेठ बडगुजर, महारू गजमल शेठ बडगुजर, दिलीप चांगदेव शेठ बडगुजर,जितेंद्र बडगुजर,हितेश बडगुजर, व समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकारणी मंडळाने मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]