हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने झाला सत्कार
अमळनेर:श्री. एन. आर. चौधरी (मुख्या. माध्यमिक विद्यालय निंभोरा ता. अमळनेर ) व श्रीमती पुष्पलता चौधरी (पदवीधर शिक्षिका, बालमोहन विद्यालय चोपडा ) यांचे जेष्ठ चिरंजीव रोहित नारायण चौधरी याची नुकतीच उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ गॅल्वे आयरलंड (यूरोप ) येथे मास्टर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरीटी या शिक्षणासाठी निवड झाली.
चि. रोहित हा नुकताच डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून कॉम्पुटर सायन्स चे पदवी चे शिक्षण डिस्टिंगशन ने पास झाला आणि त्याने पुढील उच्च शिक्षणासाठी मास्टर ऑफ सायन्स(विदेशात )करण्यासाठी पात्रता परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाला आणि जागतिक टॉप रँकिंग ची युनिव्हर्सिटी ऑफ गॅल्वे (आयरलंड)यूरोप मध्ये प्रवेश मिळवला. त्याच्या या यशा बद्दल समाज, मित्रपरिवार आणि परिसरातुन अभिनंदन आणि कौतुक होत आहे. चि रोहित हा आर. सी.पटेल महाविद्यालय शिरपूर चे प्रिन्सिपॉल डॉ. डी आर. पाटील यांचा भाचा आहे.
रोहीतचा व आईवडील यांचा सत्कार हिंदी अध्यापक मंडळाचे मा.अध्यक्ष दिपकजी पवार, सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर,प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांनी केला.व भावीवाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.