धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS.) शिबीर संपन्न

अमळनेर: धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर, दिनांक 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2024 असे सात दिवसीय मौजे- आटाळे ता. अमळनेर येथे झाले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक अनिल बाविस्कर यांच्या हस्ते 9 फेब्रुवारीला झाले या शिबिरात एकूण 75 स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थी हे आटाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत निवासी होते. तसेच या विद्यार्थ्यासोबत प्रा. महादेव तोंडे (कार्यक्रमाधिकारी), डॉ. संगीता चंद्राकर (महिला कार्यक्रमाधिकारी), व उपप्राचार्य डॉ. लीलाधर पाटील (सहाय्यक कार्यक्रमाधिकारी) यांनी काम केले. या कालावधीत विद्यार्थ्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली त्यात आटाळे गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता, झाडांना आळे केले, सर्व झाडांना पाणी टाकले, नवीन झाडे लावण्यासाठी 50 खड्डे खोदले, तसेच गावात संपूर्ण रस्ते विद्यार्थ्यांनी झाडून काढले, नाल्या साफ केल्या आणि गावातील हनुमान मंदिर, महादेव मंदिर स्वच्छता केली. व गावात जनजागृती रॅली काढली आणि विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले यातून पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव याविषयी जनजागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले.
आणि या शिबिराचा समारोप दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झाला. या समारोपाच्या कार्यक्रमाला समारोप करते म्हणून डॉ.सचिन नांद्रे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कबचौ. उमवी. जळगाव), डॉ.दिलीप गिरे ( विभागीय समन्वयक कबचौ. उमवी. जळगाव, हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के. डी.पाटील(चेअरमन धनदाई महाविद्यालय विकास समिती), हे होते. तसेच धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. महादेव तोंडे, उपप्राचार्य डॉ. लीलाधर पाटील, डॉक्टर संगीता चंद्राकर, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आटाळे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]