जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे रस्त्यास केंद्र शासनाची मंजुरी

47 कोटी 54 लक्ष निधीची तरतूद,मंत्री अनिल पाटील यांची माहिती

अमळनेर: केंद्रीय मार्ग निधी (CRIF) अंतर्गत राज्य मार्ग ३९ ते जांभोरा- ढेकू-सारबेटे- अमळनेर -वावडे या रस्त्याची सुधारणा करणे केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून या कामाची अंदाजित किंमत:
₹ 47 कोटी 54 लक्ष असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
सदर मंजुरी साठी मंत्री अनिल पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता त्याअनुषंगाने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत केंद्र सरकार च्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दि 12 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशात या रस्त्याचा समावेश झाला असून सदर मार्गावर राज्य मार्ग 39 पासून एम डी आर 51 किमी 5/200 ते 25/600 यादरम्यान 20.400 एवढ्या रस्त्याचे हे काम होणार आहे.सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी,मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस ना.अजित पवार, व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण,ना गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील,खा उन्मेष पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान अमळनेरच्या इतिहासात केंद्रीय मार्ग निधीतून प्रथमच एवढ्या मोठया प्रमाणात निधी मिळाल्याने मंत्री अनिल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]