वि.या.पाटील माध्य.विद्या.करणखेडे येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिकपाळी समुपदेशन सत्र

अमळनेर : वि.या.पाटील माध्य.विद्या.करणखेडे येथे किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिकपाळी समुपदेशन सत्र संपन्न झाले.
श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर (आरोग्य सेविका) प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड बु. यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्रात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत’ विद्यार्थीनींना मार्गदर्शन तसेच त्यांच्या शंका, समस्यांचे निराकरण करतांना त्यांच्या आरोग्याची सर्वसाधारण माहिती देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होत असलेल्या लठ्ठपणा, मधुमेह, डोळ्यांचे विकार यांसारख्या आजारांची माहिती दिली. तसेच आरोग्याची माहिती देत असतांना हात धुण्याच्या पद्धती सुद्धा कशा असाव्यात याचे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. सोबत श्रीमती कल्पना सूर्यवंशी, श्रीमती अर्चना सोनवणे तसेच विज्ञान शिक्षिक व मुख्याध्यापक नंदकिशोर पवार व आनंदा धनगर तसेच ज्येष्ठ शिक्षक साहेबराव विनायकराव पाटील, सर्व शिक्षक अजय पांडे, मुरलीधर चव्हाण, प्रशांत पाटील, शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र सोनवणे व किशोर शिसोदे यांनी यशस्वीतेसाठी हातभार लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]