विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण

सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांचे लक्षवेधले

अमळनेर: विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण व ऊर्जामुळे अशा सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी , छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे,विद्रोही तोफ सह लक्षवेधी ठरली. संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे उद्घाटन केले.
अमळनेरच्या माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील यांनी राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, गौतम मोरे,कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, किशोर ढमाले, संयोजक करीम सालार, लीना राम पवार, अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम,बापूराव ठाकरे पदाधिकारी यांचे सहसंयोजन समितीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्रोही साहित्य संमेलनाची सांस्कृतिक विचार यात्रेची जल्लोषपूर्ण सुरुवात महात्मा बळीराजा स्मारकापासून झाली.प्रांत बंगला,मार्केट ,सुनंदा पार्क,धुळे रोड मार्गे कृपया हिरोईन मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य द्वारा जवळ सर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटनानंतर कवित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत विचार यात्रेचा समारोप करण्यात आला.
सदर सांस्कृतिक वैचारिक यात्रेत उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यस्थापक सीमा रगडे,ज्योती भावसार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी जिजाऊ,सावित्री वेशभूषेसह विशेष सहभाग नोंदवला. अमळनेर मधील सरस्वती विद्या मंदिर, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय,साने गुरुजी विद्यामंदिर, उर्दू कन्या शाळा,पंडित नेहरू समाज कार्य महाविद्यालय सोबतच अमळनेरकर हजारों रसिक प्रेषक यांनी उस्फुर्तपणे मोठ्या जल्लोषाने सहभाग नोंदवला. ठरले. या विचार यात्रेत चित्ररथावरील संविधान व सहभागी महामानवांचे वेशभूषाधारी, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले वेशातील बापूराव ठाकरे,पुनम ठाकरे यांचेसह गाडगे महाराजाचे वेशभूषा केलेले यशवंत बागुल फुलचंद नाग टिळक
मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले. घोड्यावरील बाल शिवबा,राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या बालिका लक्षवेधी होते तर मेघा पाटील व विद्यार्थी यांचे उत्कृष्ट लेझीम पथक, वैशाली पाटील व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांचे काठी पथक,अनिता संदानशिव व सहकारी महिलांचे रमाई ढोलपथक , आर्मी जीप ,संबंळ नृत्य, नंदीबैल नृत्य,डोंगर नृत्य असे आदिवासी संस्कृतीचे नृत्य मनोवेधक होते तर जोगवा,भजन मंडळ, वारकरी पथक, शशांक संदानशिव यांचा मोहिनी बँड सह दहिवद गावाच्या वृक्ष लागवडीच्या मनरेगाच्या महिला भगिनींनी देवानंद बहारे, उपसरपंच शिवाजी पारधी ,सदस्य वैशालीताई गोसावी , योगिता गोसावी, यांचेसह उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
सांस्कृतिक विचार यात्रा यशस्वी करण्यासाठी या दिंडीचे व्यवस्थापन आरती पाटील, वैशाली शेवाळे, प्राचार्य डॉ.पी एस पाटील व विद्रोही मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]