ना.अजितदादा पवार यांना आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांनी दिले निवेदन

अमळनेर: राज्यातील राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मा.डॉ.तानाजी सावंत मंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी जाहीर केल्याप्रमाणे आशांना ७०००/- आणि गटप्रवर्तक १००००/- रुपये मानधनवाढ देण्याचा शासकीय आदेश (GR) तातडीने काढावा, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय निश्चित करून दरमहा पेन्शन लागु करावी, ऑनलाईन कामे तसेच आभा कार्ड,आयुष्यमान कार्ड,गोल्डन कार्ड आणि PMJAY फॉर्म ऑनलाईन भरण्याची सक्ती बंद करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दरवर्षी भाऊबीज भेट लागू करण्यात यावी, गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, कामाचा मोबदला दरमहा पाच तारखेपर्यंत अदा करावा,आरोग्यवर्धीनीच्या कामाचा थकीत मोबदला देऊन दरमहा लागू करण्यात यावा, मानधनवाढीची थकित रक्कम अदा करण्यात यावी.
या मागण्यांसाठी राज्यांतील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक दि.१२ जानेवारी २०२४ पासुन बेमुदत संपावर गेलेल्या आहेत.परंतु शासनाने आजतागायत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.म्हणून त्यांच्यात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
या पार्श्वभमीवर आज आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मा. अजित पवार अमळनेर येथे आले असता पाडळसरे धरणाच्या पाहणीसाठी जात असताना कळमसरे येथे संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देऊन आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्या आणि सूरु असलेल्या संपबाबत चर्चा केली.
आशाताई आणि गट प्रवर्तक यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्या मंजूर करण्यासाठी प्रकिया सुरू असल्याचे अजित दादांनी शिष्टमंडळाला सांगितले.
शिष्टमंडळात रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह आशा स्वयंसेविका सुनंदा पाटील, कविता पाटील,वंदना पवार, मनिषा पाटील,अरुणा चौधरी, शोभा पाटील,दिपीका राजपूत, कविता चौधरी,गटप्रवर्तक आशा पाटील तर अंगणवाडी कर्मचारी श्रीमती सरला पाटील,रेखा सोनवणे,वैशाली चौधरी,उषा पाटील,चंदन सपकाळे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]