
अंमळनेर अटकावं न्यूज :-डिजिटल कौशल्य विकासासाठी उपक्रम; पहिल्या बॅचमध्ये केवळ १० प्रशिक्षणार्थींना संधी
अमळनेर : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. महिला आणि विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळावे, तसेच त्यांच्यात डिजिटल कौशल्य व आत्मविश्वास विकसित व्हावा, या उद्देशाने DL Social Foundation, Amalner यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
संस्थेच्या Community Development & Empowerment Project अंतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा आहे. उपक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये प्रवेशाची संख्या मर्यादित ठेवण्यात आली असून, केवळ १० प्रशिक्षणार्थींना सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला व विद्यार्थ्यांना संगणकाच्या मूलभूत वापराबरोबरच डिजिटल तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात प्रभावीपणे वापर करण्याचे ज्ञान मिळणार आहे. डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा संस्थेचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांनी प्रवेश मर्यादित असल्याने DL Social Foundation कार्यालय, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ७७९६११२८९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.







