बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबाद येथे २९ वी वार्षिक सभा व स्नेहसंमेलन यशस्वी संपन्न

प्रतिनिधी: दि.२६ जानेवारी २०२४ रोजी श्री बडगुजर समाज सेवा ट्रस्ट अहमदाबाद ची २९ वी सामान्य सभा व स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात शहीद वीर मंगलपांडे ऑडीटोरियम हॉल ,ओढव, अहमदाबाद येथे यशस्वीरित्या पार पडले.
या कार्यक्रमास श्री जगदीश विश्वकर्मा, नागरिक उड्डाण मंत्री, श्री कुंदन विलास पवार UPSC ESE 2023 AIR_18, हरे. पिंपळगाव, सौ राजश्री सुदाम बडगुजर ,समाजसेविका व युट्युब वर ,पुणे, प्राध्यापक श्री सुदाम हिम्मतराव बडगुजर, समाजसेवक, पुणे, श्री मुकेश पटेल, चेअरमन हाऊसिंग कमिटी अहमदाबाद , श्री कैलास प्रेमराजशेठ बडगुजर, उद्योजक अहमदाबाद,श्री रवींद्र लालचंद्रशेठ दैवत, उद्योजक, अहमदाबाद उपस्थित होते.
सौ राजश्री बडगुजर यांनी सर्व प्रमुख मान्यवरांसमवेत सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करत कार्यक्रमास प्रारंभ केला. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचा सविस्तर परिचय व स्वागत करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष श्री जगदीश अभिमन्यूशेठ दैवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री कुंदन पवार यांनी UPSE परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कधीपासून, कशी आणि किती तयारी करावी ? याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सौ राजश्रीताई यांनी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समाज बांधवांना शुभेच्छा देत, समाज संघटनाची गरज, स्त्रीसबलीकरण तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या बाह्य स्वरूपाची पूजा न करता त्यांच्या आदर्शांची पूजा करावी व मातापित्यांचा शेवटचा श्वासापर्यंत सांभाळ करत काळजी घ्यावी असा मोलाचा संदेश तरुण पिढीला दिला. तसेच प्राध्यापक सुदाम बडगुजर यांनी माननीय मोदीजींच्या कर्मभूमीत जय जय श्रीरामाचा जयघोष करत ,समाज संघटन ,एकत्रिकरण तसेच वधु- वर परिचय मेळावा गुजरात मध्ये २०२४ मध्ये व्हावा – जी काळाची गरज आहे असे मत मांडले. श्री कैलास प्रेमराजशेट बडगुजर व श्री जगदीश दैवत यांच्या संकल्पनेतून साकार _ आमदाबाद नगरीत समाजाचे मंगलकार्यालय व्हावे या बाबतीत सकारात्मकता दर्शवित अहमदाबाद येथील समाज बांधवांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्या आवाहनस सर्व समाज बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद देत १० मिनिटातच लाखोंची रक्कम जमा झाली. श्री मुकेशभाई पटेल यांनी मंगल कार्यालयात सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
त्यानंतर सीनियर सिटीजन व सेवानिवृत्त व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच शालेय मुला-मुलींना बक्षीसं देण्यात आली,अपंग व्यक्तींना आर्थिकसहाय्य ,विधवा स्त्रियांना सहाय्यता निधी देण्यात आला.
अतिशय मनोरंजक पद्धतीने सूत्रसंचालन श्री. जगदीश दैवत व आभार सेक्रेटरी श्री सुशील मर्दान यांनी मानले. अत्यंत सुनियोजित व काटेकोर पद्धतीने सर्व कार्यकारणी सदस्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.समाज बांधव, भगिनी तसेच मुलांची उपस्थिती लक्षणीय होती .रुचकर गुजराती भोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]