अमळनेर: 14 वर्षा आतील 67 वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा आयुष दिपक सोनवणे याची स्तुत्य निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांचे मार्फत 67 वी 14 वर्षाआतील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथे करण्यात आलेले आहे, त्यात अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचा 8 वीचा विद्यार्थी आयुष दिपक सोनवणे महाराष्ट्राच्या संघात निवड झालेला खेळाडू खेळणार आहे. त्या आशयाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे दिनांक 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. आयुष हा अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिपक बुधा सोनवणे यांचा मुलगा आहे.
आयुषला जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , सॉफ्टबॉल असोसिएशन अध्यक्ष प्रदीप तळवेलकर गुरुजी, सॉफ्टबॉल निवड समिती प्रमुख किशोर चौधरी, शाळेतील शिक्षक संदीप घोरपडे, विलास चौधरी, रविंद्र कोळी, देवदत्त पाटील, भरत सुर्यवंशी, जयेश मासरे आदी यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर राष्ट्रीय खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे , सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, मुख्याध्यापक संजीव पाटील, माजी मुख्याध्यापक एस डी देशमुख, डी. ए धनगर, माजी नगरसेवक दादा पवार, अविनाश संदानशिव, निवृत्त मेजर विनोद बिऱ्हाडे, विजय संदानशिव साने गुरुजी परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराने अभिनंदन केले. त्याच्या या स्तुत्यनिवडीबद्दल अमळनेर सह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.
.