अमळनेर : राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथील महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. ईश्वर एस. पाटील यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण विकसन समिती सदस्य पदी निवड करण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरण 2020 यावर आधारित केंद्राचा अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला असतो. त्यानुसार राज्यातील सध्यस्थीती आणि आव्हानांचा विचार करून राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करायचा असतो. ही निवड प्रक्रिया जवडपास दीड वर्षांपासून सुरू होती. सुरुवातीला काही टप्पे ऑनलाईन स्वरूपात झालेत. त्यासाठी शेवटची मुलाखत ही ऑक्टोबर 2023 मध्ये प्रत्यक्षात घेण्यात आली. या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सेवेत असलेले आणि निवृत्त झालेले असे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा समावेश होता. प्रत्यक्ष निवड प्रक्रियेची मुलाखत ही इन कॅमेरा घेण्यात आली त्यात कागदपत्रे पडताडणी आणि मुलाखतीचा समावेश होता. या निवड प्रक्रियेत डॉ. ईश्वर एस. पाटील यांची गणित शिक्षणासाठी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन माझी खासदार काकासो वसंतराव मोरे, प्रशासकीय अधिकारी तथा संचालक दादासो रोहन मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वंदना पाटील, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सुहास ग्रुप अमळनेर व सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.