अमळनेर: आई कुलस्वामिनी जोगेश्वरी भक्त मंडळाच्या वतीने १४ जानेवारी रोजी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय येथे भोगी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथमच असा महोत्सव अमळनेरात साजरा झाला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून सौ कुसुम डी वाणी या उपस्थित होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प.सदस्या तथा मा. नगराध्यक्षा सौ जयश्री अनिल पाटील होत्या. या प्रसंगी सत्कारार्थी मंगला शिरोडे, वनिता महिंद आदी उपस्थित होते. ‘महिलांमध्ये एकतेचे वातावरण निर्माण व्हावे या उद्दशाने हिंदू संस्कृतीच्या जुन्या परंपरांना उजाळा देत भोगी सण एकत्रित साजरा करून एक नवा आदर्श जोगेश्वरी भक्तमंडळाने उभा केला.
सौ जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतातुन भोगी सण का व कशासाठी साजरा केला जातो हे महिलांना पटवून सांगितले व आपल्या परंपरे नुसार नाव घेऊन महिलांना हसू आवरेनासे केले.भोगी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी जोगेश्वरी भक्त मंडळाचे सदस्या सौ.निर्मला अमृतकार ,निता डेरे ,रंजना देशमुख ,स्वप्नाली अमृकार , उज्वला मालपुरे ,ज्योती अमृतकार,अनिता अमृतकर, उज्वला अमृतकार , पुजा अमृतकार , काजल अमृतकार , धनश्री अमृतकार , विना अमृतकार , अरूणा अलई व सभासद यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन वृषाली अमृतकार, प्रेरणा अमृतकार, शितल बाविस्कर यांनी केले.आभार सौ.स्वप्नाली अमृतकार यानी मानले.