विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची केली पाहणी

अमळनेर : येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या जागेची पाहणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संयोजन समितीच्या पदाधिकारी यांनी आर.के. नगर समोरील प्रस्तावित कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या मैदानात केली.
‘अमळनेर येथील १८वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक भव्य व ऐतिहासिक ठरेल ! ‘ असा विश्वास
नियोजित संमेलन स्थळ असलेल्या मैदानाची पाहणी करून राज्य संघटक किशोर ढमाले यांनी व्यक्त केला. अमळनेर येथील धुळे रोडवरील आर.के.पटेल फॅक्टरीच्या भव्य पटांगणात १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सपंन्न होणार आहे. यावेळी सदर भव्य मैदानातील मुख्य प्रवेश द्वार ,स्वागत दालन, संभाव्य मुख्य सभामंडपासह बालमंच , युवा सभामंडप, ग्रंथ दालन व पुस्तक प्रदर्शन , कला व संस्कृती दालन, यासह कृषी सम्राट बळीराजा अन्न शिवार , वाहन तळ, स्वच्छ्ता गृह आदि नियोजित जागांची पाहणी करून मान्यवरांनी विविध सूचना स्थानिक संयोजन समिती पदाधिकाऱ्यांना केल्यात.यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे
राज्यसंघटक किशोर ढमाले, राज्य पदाधिकारी एल.जे.गावित स्वागताध्यक्ष श्याम पाटील,मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लीलाधर पाटील,निमंत्रक श्री.रणजित शिंदे, प्रा.डॉ.माणिक बागले,श्रीकांत चिखलोदकर, प्रा.प्रमोद चौधरी, हेमंत पाटील आदींसह कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, अशोक बिऱ्हाडे, रामेश्वर भदाणे,दयाराम पाटील, सोपान भवरे, प्रा.सुनील वाघमारे, प्रेमराज पवार, उज्जल मोरे, राजेश राठोड, अजय भामरे, चंद्रकांत पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]