9 जानेवारीला हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने होणार वार्षिक बक्षीस वितरण

सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान व जीवनगौरव पुरस्काराने दोन शिक्षक गौरविले जाणार..

अमळनेर: येथील हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम दि.9 जानेवारी 2024 ला नियोजित असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने हिंदी दिवस निमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेत तालुक्यातील 50 माध्यमिक विद्यालयाचे 4600 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात लकी ड्रॉ पद्धतीने ग्रामीण व शहरी भागातील 36 विजेते विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. 50 विद्यालयातील सहभाग घेणाऱ्या हिंदी अध्यापकांचा कृतिशील हिंदी अध्यापक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.यासोबतच विद्यालय स्तरावरील विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन उत्तेजन देण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात राष्ट्रभाषा हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी सेवानिवृत्त हिंदी शिक्षक श्री राजेंद्र पी चौधरी (शहापूर ) व श्री विश्वास टी पवार(धार -मालपूर) यांची निवड करण्यात आलेली असून त्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्यातील सहभाग असलेल्या सर्व माध्यमिक विद्यालय हिंदी अध्यापक आणि विजेते,सहभागी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईन्शुलकर,सचीव दिलीप पाटील,खजीनदार राजेंद्र पाटील व पदाधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]