नाताळ ( ख्रिसमस) निम्मिताने कार्यक्रम करून हिंदु देवांचा अपमान करणाऱ्यांना विहिप व बजरंग दलाने केले अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन
अमळनेर :येथील सुजान मंगल कार्यालयात सहजयोग निर्मला देवी या संस्थेने श्री ख्रिसमस पूजा असा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी श्री ख्रिसमस पूजा या नावाने व्हॉट्सॲप द्वारे जाहिरात करून सर्वांना पूजेस आमंत्रित केले होते.
याख्रिसमस पूजा कार्यक्रमात व्यासपीठावर ज्या प्रकारे सजावट केली होती त्यात हिंदूंचे आराध्य दैवत श्री गणपती देवतेला सांता क्लॉज चे कपडे व टोपी घालून त्यांची विकृतीकरण केलेले होते.तसेच सोबतच पूर्ण येशू ख्रिस्तानबद्दल प्रचार करणारे पोस्टर लागलेले होते.
कार्यक्रमाची माहिती अमळनेर शहरातील हिंदु संघटनांना पडताच विश्व हिंदु परिषद व बजरंग दल चे कार्यकर्ते पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचले.
घटनास्थळी सर्व प्रकार पाहता हिंदू देवतांचा अपमान विकृतीकरण व धर्मांतरण सारख्या गंभीर प्रकाराला प्रलोभन देण्यासारखे कृत्य दिसून आले.त्यावेळी पारोळा येथील भिकेश नवनिथलाल सराफ,पाचोरा येथील भिका माळी,जळगाव येथील दिनेश कुमावत व चार ते पाच अन्य कार्यकर्त्यांन विरोधात विश्व हिंदु परिषद मार्फत पोलीस स्थानकात तक्रार करून आयोजकांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद दिली असता. अमळनेर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.