80 वर्षाच्या तरुण : पत्रकार सुभाष पाटील घोडगावकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अटकाव न्युज हितेंद्र बडगुजर –

आपल्या खानदेशात चिरपरिचित असलेले श्री सुभाष पाटील घोडगावकर १५ऑगस्ट रोजी आपल्या आयुष्याच्या ८० व्या वर्षे त्या पदार्पण करीत आहेत. त्या योगाने त्यांच्या थोडक्यात माहिती देण्याच्या प्रयत्न.
नाव :सुभाष पाटील घोडगावकर
जन्म: १५ऑगस्ट १९९४७ जन्मस्थळ: घोडगाव तालुका : चोपडा- जिल्हा जळगाव
रंग :सावळा
देह बोली : साधारण
शिक्षण : पदवीधर
व्यवसाय :सरकार मान्य पत्रकार तथा लेखक व कवी
स्वभाव: हट्टी व थोडासा तापट
लग्न : सौ रेखा सुभाष पाटील

स्नेहबंध आणि ओळख

आमचे गुरुवर्य मित्र सुभाष पाटील यांच्या जीवनपट मांडण्याच्या मी प्रयत्न केलेला आहे .स्वभाव तापट असलं तरी नारळ जसा बाहेरून टणक वाटत असला तरी तो आतून तितकाच मऊ असतो खोबऱ्याच्या कीस काढून त्यामध्ये साखर मिसळावी असा त्यांच्या स्वभाव. परिचयानंतर ते अधिक सुदृढ होत जातं हा माझा स्वानुभव आहे. याला कारण आहे आमचे स्वर्गीय मित्र राजेंद्र सुतार यांनी त्यांना आमच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यक्रमास एकदा बोलावले होते व त्यांच्या सत्कार केल्यानंतर आमची मैत्री गाढ होत गेली व आता ती बहरली सुद्धा आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही . असो.

आबा म्हणून सुपरिचित असलेले सुभाष पाटील हे शिस्तप्रिय व वक्तशीर पणा हे त्यांचे गुण आहे आकाशवाणी जळगावला असताना कार्यालयात तेव्हा सुद्धा ते वेळेवर हजर व्हायचे व आजही वेळ दिल्यावर ते त्यावेळेस हजर राहतात हे विशेष.

  • पत्रकारिता आणि भेटी गाठी*
    आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी व मुलाखती घेतल्या त्यामध्ये प्रामुख्याने ना. धो. महानोर ,शांताराम नांदगावकर, मेधा पाटकर, प्रवीण दवणे अशोक सोनवणे, दया पवार ,प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी ,संजीव कुमार सोनवणे, कै .मुमताज रहिमतपुरे आधी त्यांचे मित्र परिवारात आहे दिग्गज कुसुमाग्रज यांनी सुद्धा त्यांच्या घरी मंगरूळ निवासस्थानी भेट दिलेली आहे हे नोंद करणे महत्त्वाचे ठरेल.

निष्कलंक पत्रकारिता

आमच्या काळात आम्ही लपून छपून पत्रकारिता करत किंवा चोरून बातमी बनवत व्यासपीठावरील मान्यवरांना किंवा पुढाऱ्याला पत्रकार कुठे आहेत याच्यात थांग पत्ता सुद्धा लागत नसे. आता होत असलेली कॉपी-पेस्ट त्यावेळी नव्हती . आजच्या युगात पत्रकार बंधू अवलंबित असलेली कॉपी पेस्ट पत्रकारिता किंवा येलो जर्नालिझम त्यांना योग्य वाटत नाही . उभ्या आयुष्यात त्यांनी पत्रकारितेत वाम मार्गाने कधी पैसा मिळवला नाही .पत्रकारांनी निष्कलंक व स्वाभिमानाने रहावे असं त्यांना वाटते.

  • राष्ट्रीय सहवास आणि पुरस्कार*

राष्ट्रपिता महात्मा गांधींची सून तथा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी यांची मुलगी श्रीमती निर्मला देशपांडे यांच्यासोबत आठ ते दहा दिवसाच्या सहभाग आणि त्यांच्या घरी मुक्काम त्यांनी केलेला आहे .
दैनिक लोकमत मध्ये त्यांच्या काही वर्षापर्यंत *अंधारातील दिवे *या त्यांचे लोकप्रिय स्तंभ लेखनास महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कार १९९१मध्ये त्यांना मिळालेला आहे .

साहित्यिक योगदान
सुभाष पाटील यांनी आजपर्यंत नऊ पुस्तकांचे लेखन केलेले आहे व एका पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने सुद्धा पुरस्कृत केलेल्या आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रात अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत जसे वसंत वादळ ,स्वीकार, ऊन सावली तर काव्यात पाऊलखुणा वेदना, कडू गोड असे अनेक त्यांनी साहित्य लेखनात आपला ठसा उमटवलेला आहे. १९७५ पासून आकाशवाणी जळगाव, नागपूर, मुंबईवरून आजतागायत विविध विषयावर अडीचशे कार्यक्रम त्यांचे प्रसारित झालेले आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, मराठा, सकाळ लोकमत ,गावकरी, देशदूत ,जनशक्ती, बातमीदार आदी वृत्तपत्रातून त्यांनी लिखाण केलेले आहे .अभिरुची, किलोस्कर ,हंस ,पैंजण नवनीत, किशोर, माणूस, सत्यकथा आधी मासिकातून त्यांच्या कविता प्रसारित झालेल्या आहेत एक हजाराच्या वर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत व त्या प्रसिद्ध सुद्धा झालेल्या आहेत अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले आहे.

साहित्य संमेलन व अध्यक्षपद

अनेक साहित्य संमेलनात त्यांनी
सक्रिय सहभाग नोंदविला होता. सन् १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाने नवोदित लेखकांसाठी आयोजित केलेल्या शासकीय संमेलन आमंत्रित म्हणून त्यांना मोठ्या सन्मानाने बोलविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्था यात त्यांनी अनेक शिबिरांना उपस्थिती दिली होती.आणि त्यांच्या१९८५ चे २००१ या कालावधीतील लेखनात पुस्तके स्वरूपात प्रसिद्ध प्रसिद्धी देण्यात आली होती . जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या सुद्धा त्यांना सन्मान पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. १९८९मध्ये चोपडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष होते आणि * २००२मध्ये जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते .

दिग्गज लेखकांच्या प्रभाव
त्यांच्या साहित्य जीवनात विशेष प्रभाव असलेले लेखक वि.स. खांडेकर प्रा. ना .सी.फडके, शेक्सपियर, कुसुमाग्रज प्रा.श्री.म.माटे हे होय.

** लेखणीची धार*
महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांना सरकारने नियमितपणे मानधन द्यावे याकरिता त्यांनी आपला लढा लेखणीने सुरू केला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे सर्व जेष्ठ पत्रकारांना मानधन दरमहा नियमित रुपये २०००० देण्याचे घोषित केले व ते लागू केलेले आहे.त्यांच्या चिकाटीने व प्रयत्नाने सुमारे २०० जेष्ठ साहित्यिकांच्या या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे हे विशेष. त्यांना संजय निराधार योजनेत मिळत असलेले दरमहा नियमितपणे मिळत असलेल्या रुपये पंधराशे त्यांनी स्वच्छेने माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज करून बंद केलेले आहे.

कौटुंबिक जीवन

आबांचे थोरले बंधू
स्वर्गवासी लिंबा मोतीराम पाटील उर्फ प्राचार्य एल एम पाटील म्हणून सर्वश्रुत असलेले बंधूंचे ऋण आपल्यावर आहेत याची त्यांना जाण आहे .आपल्या आयुष्यातील जडणघडणीत व शिक्षणात त्यांनी फार मोठा भार त्यांनी उचललेला आहे याची जाणीव अजूनही त्यांना आहे हे विशेष . चार भाऊ मिळून हे त्यांचे कुटुंब आहे .

१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
प्रभू परमेश्वर त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो ही प्रभू चरणी प्रार्थना !!

*आप जिओ हजारो साल !
साल के दिन हो पचास हजार !! * मकसूद बोहरी अमळनेर

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें