मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दानपेटीतील रोकड व सोन्याचे दागिने लंपास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पाच दिवसांत चोरीची दुसरी घटना; धार्मिक दागिने व दानपेटीतील रोकड लंपास

अमळनेर : मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात 28 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. तसेच दानपेटी व कपाटांची तोडफोड करून मंदिरातील धार्मिक दागिने व दानपेटीतील रोकड चोरून नेले पाहणीत आहेत .

मंदिर सकाळी उघडण्यासाठी गेल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले, दानपेटीची तोडफोड झालेली तसेच कपाटे उघडी व आतील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. तसेच मातेच्या अंगावरील दोन हार, अंदाजे एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या टिकल्या, अंदाजे पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या तसेच दानपेटीतील अंदाजे 30 ते 35 हजार रुपयांची रोकड चोरीस गेले आहे.

या घटनेबाबत पत्रकार व अर्जदार हितेंद्र जगन्नाथ बडगुजर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी पंचनामा करून ठसे व इतर भौतिक पुरावे जतन करावेत, मंदिर परिसरासह आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

पाच दिवसांत दुसरी चोरी

विशेष म्हणजे, मातोश्री नगर परिसरात मागील पाच दिवसांत मातोश्री नगरात चोरीची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंता व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस करीत

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें