दानशूर व्यक्तिमत्व काकासो महेंद्र पाटील यांनी चामुंडा माता मंदिर निर्माण साठी जागा केली उपलब्ध
अमळनेर : जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मोठा तालुका अमळनेर शहर असुन प्रतीपंढरपुर म्हणून ओळखले जाणारे श्री संत सखाराम महाराजांचीही पुण्यनगरी व सानेगुरुर्जीची कर्म भुमी आणि दुर्मिळ अतिप्राचीन काळापासून भारतातील दोन मंदिरापैकी एक मंदिर श्री मंगळग्रह देवस्थान असलेले अमळनेर शहर. महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वत्र नाव लौकीक आहे.
चामुंडा मातेचे चरित्र:
चामुंडा माता हे दुर्गा देवीचे उग्र रूप आहे. ती देवी भगवतीचे रूप आहे, जी विश्वाची निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. चामुंडा मातेची पूजा शक्तीची देवी म्हणून केली जाते, जी सर्व वाईटांवर विजय मिळवते.
चामुंडा मातेचा जन्म देवी पार्वतीपासून झाला. जेव्हा भगवान शिवाने देवी पार्वतीचा एका युद्धात पराभव केला तेव्हा त्यांनी तिला एक तांत्रिक मंत्र दिला ज्यामुळे ती एक शक्तिशाली देवी बनू शकते. या मंत्राच्या प्रभावामुळे देवी पार्वती चामुंडा मातेच्या रूपात प्रकट झाली.
चामुंडा मातेने महिषासुर, चंद, मुंड आणि धुम्रलोचन यांच्यासह अनेक राक्षसांचा वध केला. त्याने पृथ्वीला या राक्षसांपासून मुक्त केले आणि त्यांच्या अत्याचारांपासून लोकांना वाचवले.
शक्ती, भक्ती आणि ज्ञानाची देवी म्हणून चामुंडा मातेची पूजा केली जाते. ती तिच्या भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त करते आणि त्यांना सुख आणि समृद्धी देते.
बरेच ठिकाणी ग्रामीण भागात सुध्या कुलस्वामिनी श्री चामुंडा मातेचे दर्शन व्हावे यासाठी भाविकांनी श्रद्वेने हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी मंदिरे निर्माण केली आहेत,. परंतु अमळनेर येथे बाहेरच्या गावी जाऊन मातेच्या दर्शन व चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्यांना जाणं शक्य होत नाही. अशी खंत काही मातेच्या कूळातील भक्तांना वाटत होती . ते लक्षात घेता बडगुजर समाज पंच मंडळातील श्रद्धाळू कार्यकत्यानी कुलस्वामिनीश्री चामुंडा माता मंदिर निर्माण कार्य स्वप्न साकार करण्यासाठी हिरीरीने देवावरील विश्वास, श्रद्धा, भक्ती, प्रांजळ सद्धभावनेने लौकरच निर्माण साठी जोमाने तयारीला लागले आहेत. त्याचीच सुरूवात म्हणजे येथील धुळे रोड, आर. के.नगर लगत असलेल्या मातोश्री नगरमध्ये मंदिर निर्माण बाबतीत दानशूर व्यक्तिमत्व काकासो महेंद्र पाटील यांनी चामुंडा माता मंदिर निर्माण साठी जागा उपलब्ध करून दिली व ती जागा निश्रित करण्यात आली. या प्रसंगी जागेचे मालक व मंदिरासाठी अनमोल सहकार्य तथा मार्गदर्शन करणारे सन्मानिय काका साहेब श्री.महेन्द्र श्रीराम पाटील ( यश बिल्डर्स.डेव्हलपस). तसेच श्री.आबासाहेब प्रवीण पुंडलिक शेठ बडगुजर ( अध्यक्ष क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ) श्री.बापुसाहेब जगन्नाथ शेनपडूशेठ बडगुजर ( जेष्ठ पत्रकार, संपादक व अध्यक्ष बडगुजर समाज पंच मंडळ अमळनेर) ‘श्री.आण्णासाहेब कैलास महादू शेठ बडगुजर (खजिनदार) श्री. नानासाहेब विजय बन्सीलाल शेठ बडगुजर सरजी ( कार्यकारिणी सदस्य) श्री. भाऊसाहेब किरण शांताराम शेठजी बडगुजर सर ( कार्य, सदस्य व धडाकेबाज सुत्र संचालक) श्री दादासाहेब प्रभाकर सुकदेव शेठ बडगुजर (सहसचिव) आणि बापुसाहेब सुरेश देवीलालशेठ मांडळकर ( निवृत्त एसटी महामंडळ )अमळनेर हे उपस्थित होते.
“सर्वाना विनंती की अमळनेर सारख्या पुण्य नगरीत श्री कुलस्वामिनी चामुंडा मातेच्या मंदिर निर्माण कार्यास सढळ हाताने शक्य तेवढ्धे सहकार्य व मदत करावी असे आव्हान ज्येष्ठ पत्रकार श्री बापुसाहेब जगन्नाथ शेनपडूशेठ बडगुजर यांनी समाज बांधवाना केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार श्री बापुसाहेब जगन्नाथ शेनपडूशेठ बडगुजर संपादक साप्ताहिक अटकाव, (अध्यक्ष बडगुजर समाज पंच मंडळ अमळनेर )