मारवड, अमळनेर -नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आमदार निधीतून मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूलला संगणक संच भेट दिला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामात असलेल्या अडचणी माहित करून घेण्यासाठी नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी नुकतेच मारवड येथील सु. हि. मुंदडे हायस्कूल, येथे सदिच्छा भेट घेतली.
विद्यार्थी हित लक्षात घेता शिक्षकांची मानसिकता चांगली राहण्यासाठी त्यांना दैनंदिन अध्यापन प्रकियेत कुठलीही अडचण येऊ नये. त्यांचेवर असलेले मानसिक दडपण व त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आ. दराडे यांनी शाळेत शिक्षकांशी संवाद साधला.
शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना मोबदला द्यावा लागतो, हे लपून राहिलेले नाही. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष, माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम. ए पाटील उपस्थित होते.
सदर कार्यक्रम दरम्यान संस्थेच्या शाळेचे मुख्यध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक आमदार श्री किशोर दराडे यांना पगार सुरु होण्याबाबत निवेदन दिले. याची तात्काळ दखल घेऊन याबाबत मा. शिक्षणाधिकारी सो यांच्याशी संपर्क साधून पगार सुरू करण्याबाबत सूचना केल्या तसेच कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांना पगार थांबवता येतो का? याबाबत विचारणा केली.
याच व्यासपीठावर मारवड शाळेला त्यांनी संगणक भेट देतो आहे असे सांगून त्याची पूर्तताही लगेच तालुक्यातील आयोजित एका कार्यक्रमात केली. शिक्षकांचे अजून काही प्रश्न असतील तर मला थेट संपर्क साधा असाही सवाल त्यांनी शिक्षकांना केला.
यावेळी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन एस. आर. बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन एल. एन. सैंदाणे यांनी व्यक्त केले.