महिला हक्क संरक्षण समिती वर सुवर्णा धनगर मॅडम यांची (महिला राज्य उपाध्यक्ष)म्हणून निवड

अमळनेर: दिनांक 5/11/ 2023 रोजी संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटना 257/89 केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.विशेष बाब म्हणून या ठिकाणी केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते व राज्याध्यक्ष आदरणीय शिवराज जाधव साहेब यांच्या आदेशाने राज्य कार्यकारणीवर महिला हक्क संरक्षण समिती वरती जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक काम करणाऱ्या आदरणीय श्रीमती सुवर्णा धनगर मॅडम यांची (महिला राज्य उपाध्यक्ष)म्हणून निवड करण्यात आली सुवर्णा धनगर ह्या आदर्श शिक्षक श्री A.B.धनगर सर (वि.या.पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा ता. अमळनेर)यांच्या धर्मपत्नी आहेत.
बैठकीत राज्याध्यक्ष आदरणीय श्री शिवराज जाधव साहेब तसेच कोषाध्यक्ष आदरणीय श्री पुरुषोत्तम वैष्णव साहेब, महिला सरचिटणीस आदरणीय श्रीमती निकम मॅडम,राज्य कार्याध्यक्ष आदरणीय श्री वसंत बैसाणे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय श्री अजय चौधरी तसेच बुलढाणा जिल्हा कार्यकारणी च्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले.आणि राज्यभरातून सर्व जिल्हा पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय पारित करण्यात आले. सर्वांना संबोधित करत असताना राज्याध्यक्ष आदरणीय शिवराज जाधव साहेब यांनी विविध विषयांवर चर्चा करून आपले परखड मत केले.आणि सर्वांनी एकमताने त्यांना पाठिंबा दिला तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.
श्रीमती सुवर्णा धनगर यांची राज्य महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यातील आदरणीय योगेश सनेर सर,मंगेश बोईटे सर संचालक ग स सोसायटी जळगाव, तुषारदादा बोरसे संचालक माध्यमिक सोसायटी जळगाव तसेच साने गुरुजी पतपेढी अमळनेर, आदरणीय श्री सुशील जी सोनवणे अध्यक्ष धन्वंतरी जि.प. कर्मचारी सोसायटी जळगाव,श्री डी ए धनगर सर,श्री वसंत बैसाणे, संजय पाटील, जितेंद्र मोरे,अजित बाविस्कर, श्रीमती प्रेमलता पाटील, अजय चौधरी, श्री N.S. पवार सर, श्री कुणाल पवार, श्री राकेश शिंपी, श्री सुनील ढाके, श्री ज्ञानेश्वर पाटील, श्री देवेंद्र पाटील, श्रीमतीवहिदाबी खान, श्रीमती अरुणा सूर्यवंशी, श्रीमती सुवर्णा भोपे तसेच विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा प्राप्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]