मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर : अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत व हौशी महिलांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अचानक दिलेल्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सहभागी स्पर्धकांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची दाद मिळविली.
स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम क्रमांक, सीमा पाटील यांनी द्वितीय, तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच रेखा मराठे व अपेक्षा पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत आशा पाटील, पूजा पाटील, श्वेता पाटील, शोभा पाटील, रजुताई सूर्यवंशी, मंगलाबाई पाटील, प्रतिभा शिसोदे, मनीषा पाटील, उर्मिला पाटील, प्रियदर्शनी भोसले, माधुरी पाटील आणि योगिता सूर्यवंशी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री पाटील होत्या. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सौ. गायत्री भदाणे व सौ. स्वप्ना पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. भारती (आक्का) पाटील व सौ. भारती पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या संचालिका मंगला पाटील, सुनीता पाटील, लीना पाटील, पद्मजा पाटील, माधुरी पाटील, मनीषा पाटील, प्रभावती पाटील, राजश्री पाटील, कृपाली पाटील आणि नलिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपक्रमामुळे महिलांमधील वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत होण्यास निश्चितच चालना मिळाली.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें