सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलचा दहावीचा १००% निकाल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर | अटकाव न्यूज:
सीबीएसई बोर्डाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलने यंदाही १००% निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा हा सलग तिसरा वर्ष असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
यंदाच्या निकालात योगेश प्रभाकर पाटील याने ९७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शिवम अर्जुन त्रिपाठी याने ९४% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर देवेश जितेंद्र चोरडिया याने ९०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. तेजस किशोर पाटील याने ८८% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळवला. उर्वरित सर्व विद्यार्थी देखील उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. सुरेंद्रकुमार बोहरा, सेक्रेटरी श्री. प्रकाश बोहरा, व्यवस्थापन समिती सदस्य श्री. मुकुंद बोहरा, डॉ. गौरव बोहरा तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें