निर्भीड पत्रकारितेचा गौरव : ईश्वर महाजन यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमळनेर | अटकाव न्यूज :
देवगाव-देवळी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तसेच पत्रकार ईश्वर आर. महाजन यांच्या निर्भीड आणि सकारात्मक पत्रकारितेची दखल घेत त्यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवार्ड 2025’ने सन्मानित करण्यात आले आहे. व्हॉईस ऑफ मीडिया (VOM), आयुष्यमान भारत मिशन (महाराष्ट्र समिती) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड होणारे ईश्वर महाजन हे एकमेव पत्रकार ठरले असून, राज्यभरातील निवडक पंधरा पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमळनेर तालुका व शहरातील विविध संस्था, संघटना आणि मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अमळनेर तालुक्याच्या वतीने महाजन यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, उपनगराध्यक्ष व शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, दयाराम पाटील, विंचुरकर सर, आर. यू. पाटील, जाकीर शेख, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता पवार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईश्वर महाजन यांच्या या यशामुळे अमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात मानाची भर पडली असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Atkav News
Author: Atkav News

Leave a Comment

और पढ़ें