भरधाव वेगाने जाणा-या मर्सिडीज कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर.

एरंडोल प्रतिनिधी- जळगाव कडून नासिक येथे भरधाव वेगाने
जाणा-या मर्सिडीज कारने मोटारसायकलला
समोरून दिलेल्या धडकेत शेतातून घराकडे जाणारे
दोन युवक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर
जखमी झाला. जखमीस जळगाव येथील रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी
साडेसहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महार्गावरील
पिंपळकोठा गावाजवळ झाला. अपघातानंतर राष्ट्रीय
महामार्गावरील वाहतूक काही काल ठप्प झाली होती.
याबाबत माहिती अशी, कि आज सायंकाळी साडेसहा
वाजेच्या सुमारास नितीन जामसिंग पाटील वय
२५,घनश्याम भानुदास बडगुजर हे दोन युवक GJ
19 ए.सी.7540 या मोटरसायकलने घरी जात होते
तर नारायण धनसिंग पाटील वय-२४ हा युवक
रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात
पिपंळकोठ्याजवळील नाल्याजवळ जळगाव

येथून नासिककडे भरधाव वेगाने येणा-या मर्सिडीज
कार क्रमांक एम.एच. १५ एच. वाय. 0700 ने
मोटरसायकलला समोरून जोरदार धडक
दिली. मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे मोटर
सायकलचे अक्षरश: तुकडे झाले आणि मोटर
सायकलवरील नितीन जामसिंग पाटील व घनश्याम
भानुदास बडगुजर दोन्ही. रा. पिंपळकोठा हे दोन युवक
जागीच ठार झाले.
तर रस्त्याच्या कडेने शेतात पायी जाणरे नारायण
धनसिंग पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर
जोरदार आवाज झाल्यामुळे पिंपळकोठा येथील
ग्रामस्थांनी अपघातस्थळी जाऊन मदतकार्य सुरु
करून जखमीस जळगाव येथे रवाना केले. जिल्हा
परिषदेचे माजी सदस्य नाना महाजन, संभाजी

ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, झुंजार
प्रतिनिधी रामकृष्ण पाटील, अशोक बडगुजर, बापू
बडगुजर, यांनी अपघाताची माहिती पोलिसाना
दिली. अपघाताची माहिती मिळताच महेंद्र
पाटील, रवींद्र तायडे, जुबेर खाटिक, धर्मेंद्र ठाकुर, हेमंत
घोंघडे यांनी अपघातस्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर
काढले आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत
केली.
अपघातात मयत झालेले दोन्ही युवक अविवाहित
होते. नितीन पाटील याचे पच्छात आई, वडील, भाऊ व
विवाहित बहिण असा परिवार आहे तर घनश्याम
बडगुजर याचे पच्छात आई, वडील, व बहिण असा
परिवार आहे. गंभीर जखमी झालेल्या नारायण पाटील
याचा ३१ तारखेला विवाह आहे. याबाबत गजानन
जगन्नाथ बडगुजर यांनी दिलेया तक्रारीवरून
मर्सिडीज कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]