शहापूर उपसरपंचपदी कैलास पाटील यांची बिनविरोध निवड

उपसरपंचपदी कैलास पाटील यांची बिनविरोध निवड

अमळनेर : पांझरा नदी काठावरील शहापूर ता.अमळनेरच्या उपसरपंचपदी कैलास प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपसरपंचपदी  नानाभाऊ शिरसाठ यांनी राजीनामा दिल्यानंतर कैलास पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

 कैलास पाटील यांच्या गळ्यात उपसरपंचपदाची माळ  पडली. यावेळी जनतेची सेवा विकास कामे आणि महिलांसाठी काहि शासकीय गृह उद्योग, आणि कोणत्याही सामाजिक कार्यात सरपंच सदस्य यांच्या बरोबर राहून चांगली कामं करण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध राहू असे ते म्हणाले

यावेळी सरपंच सुमन पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब पाटील, डॉ.विश्वास पाठील, सुनील पाटील, रूपेश भिल, ज्ञानेश्वर माळी, तेजस्विनी भिल, शिरसाठ,ग्रामसेवक समाधान निकम, पोलिस पाटील भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *