लोकन्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव , सामाजिक, राजकीय मान्यवरांची उपस्थिती—–
अमळनेर – अल्पावधीतच लोक प्रिय झालेले वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोक न्यूज वेबपोर्टेलचे महाराष्ट्रातील पहिल्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले. शहरातील धुळे रस्त्या लगत असलेले शिवांश बिजनेस हब च्या तिसऱ्या मजल्यावर हे कार्यालय असून मुख्य संपादक संभाजीराव देवरे यांच्या मालकीचे हे पोर्टल आहे. शहरातील राजकीय, सामाजिक,
सांस्कृतिक,शैक्षणिक,,धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या जन्मदायी आई भिकुबाई सुकलाल देवरे यांच्या हस्ते ह्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पत्रकारीता क्षेत्रातील नामवंत नाव असलेले देवरे यांनी आईच्या
कष्टाची उत्तराई म्हणून आईच्या हस्ते उद्घाटन केले.
कार्यक्रमाला शहरातील उद्योजक ओमप्रकाश मुंदडा, उद्योजक सरजूरोठ गोकलाणी, प्रा.अशोक पवार, माजी नगरसेवक, बाळा पवार,अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन, प्रथमेश पवार, संजीव संदानशिव, संतोष पाटील, बापुराव ठाकरे, सुरेश देवरे, शिवाजी देवरे, संतोष लोहार, ज्योत्स्ना लोहार, पंकज देवेरे,विनोद पाटील,पत्रकार प्रा.हिरालाल पाटील,बाबूलाल पाटील,विजय पाटील,रोहित बडेजा, काशिनाथ चौधरी, म.रा.म.पत्रकार संघ तालुकाध्यक्ष समाधान मैराळे,सुरेश कांबळे, नूरखान पठाण, उमाकांत ठाकुर, गोरख पाटील, दयाराम पाटील, देवेंद्र जाधव, दिनेश जाधव,अशोक मोरे यासह शहरातील लोकन्युज वर प्रेम करणारे नामवंत नागरीकांनी उपस्थिती दिली.
मागील ६ वषर्षापासुन महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही लोकन्यूजने अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.
“शुभेच्छा व भेटी”
महाराष्ट्र राज्याचे मदत व पुर्ववसन मंत्री ना. अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ,मा. आमदार शिरीषदादा चौधरी, खा.शि.मंडळ संचालक माधुरी पाटील कृ.उ.बा.संचालक सुषमा देसले,माजी नगरसेवक बबलू पाठक,सामाजिक कार्यकर्ता मनोज शिंगाने, डॉ. दिनेश पाटील,पांडुरंग महाजन, प्रा. ईश्वर पाटील,अनंतकुमार सूर्यवंशी,पोलीस पाटील बाम्हणे गणेश भामरे, पटेल स्टूडीओचे संचालक भगवानदादा पाटील,पत्रकार जितू ठाकूर,संजय पाटील,विकी जाधव,डॉ.विलास पाटील,मुन्ना शेख
व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेश सचिव डॉ.डिगंबर महाले, जयेश काटे, उमेश काटे, अजय भामरे, किरण चव्हाण,रवी मोरे, राहुल बहिरम, मधुसुधन विसावे,निरंजन पेंढारे,मिलिंद पाटील, रविंद्र बोरसे,विवेक अहीरराव, प्रा.जितेंद्र पाटील,जयवंत वानखेडे, दयाराम पाटील आदींनी लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे यांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.