अतिवृष्टीचे पंचनामे करून प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर पाठवा

खासदार स्मिताताई वाघ यांच्या अमळनेर तहसीलदारांना सूचना

अमळनेर : तालुक्यातील मांडळ, पातोंडा, मारवड तहसील मंडळात अतिवृष्टीचे पंचनामे करून प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर पाठवा अश्या सूचना खासदार स्मिता उदय वाघ यांनी अमळनेर तहसीलदार यांना केल्या आहेत.
या संदर्भात अमळनेर तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की अमळनेर तालुक्यात दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या रात्री मांडळ, पातोंडा, मारवड व उर्वरित बाकी तहसील मंडळातील गावांमध्ये ६५ मी.मी. पेक्षा जास्त पावसाचे प्रमाण वाढल्याने त्या गावांमध्ये अतिवृष्टी झालेली असून मौजे टाकरखेडा कुरहे शिवारात धुळे येथील धनगर लोकांच्या २० ते २५ मेंढ्या वीज पडून ठार झाल्या आहेत.तसेच तालुक्यातील सर्व तहसील मंडळातील शेतकऱ्यांचे कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यास्तव आपण सर्व तहसील मंडळात अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश करावे व अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात यावा अश्या सूचना खासदार श्रीमती. स्मिता उदय वाघ यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]