बहिणीनो आपल्याला महायुतीचे अनिल दादाच्याच पाठीशी उभे राहायचे -,खा.स्मिता वाघ
अमळनेरात लाडकी बहिण मेळाव्याला झाली रेकॉर्ड ब्रेक गर्दी
अमळनेर: महायुती सरकारच्या काळात अमळनेर विधानसभेच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहला गेला असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात मला तुमची साथ हवी आहे.लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महायुती सरकार सदैव त्यांच्या पाठीशी असून या भूमीसाठी मी एकटा काहीच करू शकत नसल्याने सामूहिक जबाबदारी घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्वल करा असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी केले.
तर बहिणींनो ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीशी राहून मला भरभरून मतांनी खासदार केले त्याच पद्धतीने आपल्याला सर्वांना महायुतीचे उमेदवार अनिल दादाच्याच पाठीशी राहायचे असून त्यांची झोळी रिकामी राहू देऊ नका,धरण पूर्ण करायचे असेल तर राज्यात महायुतीचे च सरकार हवे असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींचा सन्मान सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गट सदस्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन अमलनेरात करण्यात आले होते.प्रताप महाविद्यालयात अतिशय भव्य शामियानात आयोजित या मेळाव्याला महिलांची हजारोंच्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.याठिकाणी उत्तम बैठक व्यवस्था व नियोजन करण्यात आले होते.दुपारी सव्वा दोन वाजता मेळाव्याला सुरुवात झाली.यावेळी पावसाने प्रचंड जोरात हजेरी लावून देखील मेळावा यशस्वी झाला.
व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ना.पाटील पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना आज तळागाळापर्यंत पोहचत आहेत.अमळनेर तालुक्याला लागलेला दुष्काळी तालुका हा डाग येणाऱ्या काळात पुसून टाकायचा असून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत पाणी नेण्याचं उद्दिष्ट आहे.पाडळसरे प्रकल्पाबाबतीत राज्य आणि केंद्र सरकार सकारात्मक असून सर्वच प्रशासकीय मान्यता प्रकल्पाला मिळाल्या असून लवकरच केंद्राच्या यादीत त्याचा समावेश होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच अजित दादा पक्के आपल्या पाठीशी आहेत.सुरवातीला एवढा मोठा मंडप भरेल का अशी चिंता असताना आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी उपस्थिती देऊन मोठे प्रेम दिले आहे,असेच प्रेम भविष्यात अपेक्षित असून येणारा काळ आपल्याला सुजलाम सुफलाम करायचा आहे.आपल्याला घरात दररोज व शेतात थेट पाणी हवे असेल,सर्वत्र बंधारे हवे असतील,ठिकठिकाणी रस्ते पाहिजे असतील डब्या चगविनार्यांच्या नादी न लागता आमचे हात मजबूत करा.असे आवाहन त्यांनी केले.आणि आतापर्यंत महिलांना अर्थसहाय्याची कोणतीच योजना बंद पडली नसल्याने लाडकी बहीण योजना कधीच पडणार नाही असा विश्वास त्यांनी महिलांना दिला.
केंद्राच्या माध्यमातून मी तर राज्याच्या माध्यमातून मंत्री अनिल पाटील हवेत यावेळी
बोलतांना
खासदार
स्मिता वाघ यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी नेहमी प्रयत्नशील असून शासनाच्या योजना आज घराघरापर्यंत पोहचत आहेत.लाभार्थी महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनापासून पैसे जमा व्हायला सुरवात झाली असून भाऊबीज देखील आनंदात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्राच्या माध्यमातून मी तर राज्याच्या माध्यमातून मंत्री अनिल पाटील मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या काळात महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहायचे आहे.अडीच महिन्यात आपले धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ट होणार आहे मात्र यासाठी राज्यात आपले महायुती सरकार व त्यात दादा आमदार असणे आवश्यक आहे.अनिल दादा कडे मदत व पुनर्वसन विभाग असल्याने त्यांनी शेतकऱ्यांना काहीच कमी पडू दिले नाही त्यामुळे आपल्यासाठी तेच हवेत आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले. दरम्यान सदर मंचावर सर्व समाजाच्या महिला प्रतिनिधींना स्थान देण्यात आले होते तर उपस्थित सर्व
महिलांचे सौ जयश्री पाटील यांनी हळदी कुंकू देऊन औक्षण केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे व डिगंबर महाले यांनी केले.