एस टी महामंडळाच्या बस वाहकाच्या प्रामाणिकपणा

धुळे प्रतिनिधि: राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणे केवळ सुरक्षितच राहत नाही तर एसटीचे कर्मचारी प्रामाणिक असतात त्याच्या प्रत्यय आज आला धुळे चोपडा बस आज दुपारी अंमळनेर बस स्थानकात पोहोचल्यानंतर बस कंडक्टर ऐ.ओ. सैंदाणे यांना एका सीटावर पाकीट आणि मोबाईल आढळून आला त्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत ताबडतोड ते पाकीट आणि मोबाईल अमळनेर स्थानक प्रमुखाच्या स्वाधीन केले आगार प्रमुख आणि मोबाईल वरून संपर्क साधत प्रवासी भगवान दौलत मरसाडे यांना बोलवून घेतले त्यांना पाकीट आणि मोबाईल त्यांच्या सुपूर्द करण्यात आले 4000 रुपयाची रोकड रक्कम होती वाहकाच्या प्रामाणिक पनाने प्रवासी भारावले म्हणून चालक वसंत फकीरा पाटील व वाहक श्री ए.ओ.सैंदाणे याचे धुळे आगारातील कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]