वासरे गावातील बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवडीत गैव्यवहार, चौकशीस पंचायत समिती करीत आहे विलंब..

तक्रारदार आत्माराम अहिरे 26 जानेवारीला बसणार उपोषणास

अमळनेर: तालुक्यातील वासरे गावातील बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवडीत गैव्यवहार झाल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम अहिरे यांनी चौकशी करण्यात यावी म्हणून गट विकास अधिकारी यांना अर्ज केला आहे.या अर्जाचा संदर्भ घेऊन गट विकास अधिकारी शिंदे यांनी पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी नरेगा किशोर ठाकरे व हितेंद्र चव्हाण यांना तात्काळ चौकशी करण्याबाबत लिखित आदेश देऊन ही आजतागायत चौकशी केली नसल्याचे आढळून आले.याबाबत तांत्रिक अधिकारी ठाकूर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,चव्हाण यांची तब्येत ठीक नसल्याने चौकशी होऊ शकली नाही तर चव्हाण आल्यावर चौकशी करू,असे सांगितले.दुसरे तांत्रिक अधिकारी चव्हाण यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तब्येत ठीक नसल्याने जाऊ शकलो नाही मात्र येत्या मंगळवारी जाऊ,असे सांगितले.गट विकास अधिकारी शिंदे यांनी आदेश देऊन जवळजवळ 20 दिवस उलटून गेल्यानंतरही चौकशी होत नसल्याने तक्रारदार आत्माराम अहिरे यांनी अटकाव न्युज शी बोलताना सांगितले की, तांत्रिक अधिकारी मुद्दाम चौकशी करत नाही त्यामुळे येत्या 26 जानेवारीला या गैरव्यवहार करणाऱ्या व चौकशीस टाळा टाळ करणाऱ्या अधिकार्यां विरोधात उपोषणास बसणार आहे.या बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड योजनेत काम करणार्या मजुरांची संख्या व प्रत्यक्षात काम करणाऱ्या मजुरांची संख्या मध्ये मोठी तफावत आढळून येते.कमी मजुरां कडून काम करून घेतले जाते मात्र मस्टरवर असलेल्या मजुरांची मजुरी काढली जाते. सदर गैव्यवहार हा लाखो रुपयांचा असल्याने याला जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून माझा लढा आहे,असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]