लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाज महा अधिवेशन संपन्न..

लोहारी पाचोरा येथे महाराष्ट्रात बडगुजर समाज संख्येने लहान असला तरी मनाने हा समाज मोठा असून दिलेल्या शब्दाला जागण्याची त्यांची ख्याती आहे.बडगुजर समाजाची एकजूट उल्लेखनीय असून समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई पुणे आदी मोठ्या शहरात लवकरच समाजाचे वस्तीगृह उभारण्याचा मनोदय व्यक्त करून आचारसंहितेमुळे त्याची घोषणा करता येणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या महा अधिवेशनात ते बोलत होते.
बडगुजर समाज चामुंडा माता मिशन संचालित अखिल बडगुजर समाज महाअधिवेशन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी खास उपस्थित दिली होती.
यावेळी मंचावर पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री.गिरीश महाजन,आ.किशोर अप्पा पाटील आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, खासदार ज्ञानेश्वर पाटील( मध्य प्रदेश ),दयानंद महाराज, माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील,नरेंद्र बडगुजर, संजय गोहिल, सुमीत पाटील, उमेश करोडपती आदींची उपास्थिती होती.
यावेळी आ. किशोर अप्पा पाटील, ना.गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थिताना संबोधित केले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, चांमुंडा मातेच्या आशीर्वादानेच आम्ही देखील राज्यात सत्तांतर केले असून आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याचे जीवनमान बदलले पाहिजे यासाठी आम्ही काम करत असून
राज्यात आपल्या सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत.राज्यातील 30 हजार पाणी पुरवठा योजनांना नामदार गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली असून ओबीसी समाजासाठी असलेल्या सारथी,महाज्योति योजनांना आम्ही उभारी देत असून अमृत योजनेचा लाभ देखील प्रभावीपणे जनतेला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. केंद्रात पंतप्रधान देखील राज्याला सर्वतोपरी सहकार्य करत करत असल्याचे त्यांनी सांगितले.तर मी सी एम म्हणजे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून काम करत असल्याचे सांगत त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला . अमळनेर येथून क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर बडगुजर समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *