सराईत गुन्हेगार दादू धोबी यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केले रवाना..!

मा.पोलीस अधीक्षक श्री एम.रामकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच अमळनेर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, यांनी अमळनेर येथील गुन्हेगारीचा आढावा घेतला. मा. अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री. रमेश चोपडे साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर श्री. राकेश जाधव यांचे मार्गदर्शन घेतले.
पोलीस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील काही हिस्ट्रीशिटर्स गुन्हेगारीत अतिशय सक्रिय आहेत. त्यातील दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ (धोबी) रा.जुना पारधी वाडा, सुभाष चौक,अमळनेर हा अतिशय सक्रिय असल्याचे दिसून आले. लोकांची लूटमार करणे चाकू, सुरे तलवार घेवून लोकांमधे दहशत निर्माण करणे, न्यायालयीन कोठडीत असतांना पोलीसांच्या रखवालीतून पळून जाणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे. असे अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत. असे त्याच्यावर विविध कायदा व कलमान्वये 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणीही साक्षीदार त्याच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्यास तयार होत नसे. अमळनेर रहिवासी निमूटपणे त्याचे गुन्हे सहन करीत होते. ही जनसामान्यांची भावना जाणून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्यावर MPDA कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक जळगाव व मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने मंजूर करवून त्यास MPDA कायद्याअंतर्गत नाशिक सेन्ट्रल जेल येथे स्थानबद्धते साठी पाठविण्यात आले आहे. अशी स्थानबद्धता ही एक वर्ष कालावधीची असते. अशा गुन्हेगारावर अशी कठोर कारवाई केल्याने अमळनेरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे व पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे!
या मोठ्या व परिणामकारक कारवाई मुळे अमळनेर मधील गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरली आहे. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य टिममधील पोहेका /किशोर पाटील, पोना/दिपक माळी, पोका/रविंद्र पाटील,पोहेका शरद पाटील,पोका/सिद्धांत सिसोदे यांनी मदत केली आहे.
तसेच पो.उ.नि.अनिल कभुसारे, पोहेका प्रमोद पाटील, पोका/जितेंद्र निकुंबे, पोका/कमलेश बाविस्कर यांनीदेखील हातभार लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]