पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे साहेब यांनी ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलीस स्थापना दिनाचे सांगितले महत्व.

अमळनेर: दि.०३/०१/२०२३ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये शहरातील ग्लोबल स्कूल चे ९ ते १० वीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) पोलीस स्टेशनला भेट आयोजित करुन त्याना पोलीस स्थापना दिनाचे (रेझिंग डे) चे महत्व समजावुन सांगण्यात आले. तसेच पोलीस स्टेशनच्या दैनंदिनी कामकाजाची विभाग नुसार प्राथमिक स्वरुपाची माहिती तसेच त्यांनाशस्त्रगार मधील शस्त्रांची माहिती देखील देण्यात आली. सदर वेळी शाळेचे १२० ते १३० विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते. सदर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना पोलीसांबदल असलेली भिती मनातून काढून त्यांना पोलीस खात्याचे कामकाज समजावून सांगितले. तसेच सध्या स्थितीत सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नये. काही अडचण अगर माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आम्हास कळवावे. तसेच तक्रारीचे स्वरूप काय असते तक्रार कशी नोंदवली जाते या बाबत योग्य मार्गदर्शन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे साहेब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *