अमळनेर: द्रौ.रा कन्याशाळेत सकाळ व दुपार विभागात सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सर्व संचालन विद्यार्थीनिंनी केले. विद्यार्थीनिंमध्ये नेहा पाटील, मुग्धा विसपुते, कोमल पाटील, जयश्री पाटील,वैष्णवी पाटील, भाग्यश्री पाटील, गायत्री पाटील ,हर्षदा पाटील ,कृतिका साळुंखे , निलक्षी बागुल, ऋतिका पाटील, तनुश्री पाटील, प्रांजल सणांसे, यशोदा शिसोदे, प्राची मोरे,सृष्टी सैदाने,अदिती साळुंखे, गौरी जाधव ,कावेरी पाटील, धनश्री पाटील , यांनी भाषण केले. शाळेचे मुख्याध्यापिका सौ. सीमा सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. बी.एस.पाटील, पर्यवेक्षक श्री व्ही.के वानखेडे,जेष्ठ शिक्षक श्रीमती एस. पी. बाविस्कर, श्री के एस मोरे,श्री एस. एस. माळी, उपस्थित होते.सकाळ व दुपार विभागाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन इयत्ता ९ वीची तनवी सोनार तर आभार मुक्तमाला पाटील हिने मानले.
इयत्ता दहावीची विद्यार्थीनी प्राची मोरे बनली सावित्रीबाई फुले
इयत्ता दहावीची विद्यार्थीनी ही शाळेत सावित्रीबाई फुले बनून आलेली होती. ती सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसली. तिने आपल्या भाषणातुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तिचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.