जळगाव जिल्हा पोलीस दलात १६ पाल्यांना अनुकंपा धोरणानुसार ‘पोलीस शिपाई’ पदावर पोलीस ‘स्थापना दिवस निमित्त नियुक्तीपत्राची सुखद भेट देण्यात आली..

जळगाव जिल्हा पोलीस दलात कर्तव्यावर असतांना दिवंगत झालेल्या पोलीस अमलदार यांच्या १६ पाल्यांना अनुकंपा धोरणानुसार ‘पोलीस शिपाई’ पदावर पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ निमित्त नियुक्तीपत्राची सुखद भेट देण्यात आली

जळगाव: शासकीय सेवेत असताना दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अनेक वर्ष प्रतीक्षेत राहावे लागते परंतु अलीकडे शासनाने अनुकंपा भरतीची मर्यादा वाढविल्याने शासन नियमाचे त्वरेने पालन करून जळगाव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक माननीय श्री एम राजकुमार यांनी पोलीस दलातील दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे वारसांना जलद गतीने अनुकंपा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवून दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी प्रेरणा सभागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव कार्यालयात १६ उमेदवारांना जळगाव जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदावर नियुक्ती आदेश मा. पोलीस अधीक्षक, श्री एम राजकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येवून पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ व नववर्षाची भेट दिली. यावेळी उपस्थित नवनियुक्त उमेदवार यांना पोलीस दलातील कर्तव्याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. व भरती प्रक्रियातील कामकाजासाठी मेहनत घेणारे पोलीस उप अधीक्षक(गृह) श्री संदीप गावित, कार्यालय अधीक्षक श्री प्रवीण पवार, वरिष्ठ लिपिक श्री योगेश रावते, श्री दीपक जाधव, श्री सुनील निकम, लिपिक श्री देविदास बाविस्कर आस्थापना शाखा पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कौतुक केले. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक श्री संदीप गावित, श्री कुणाल सोनावणे, कार्यालय अधीक्षक श्री प्रवीण पवार, पोलीस निरीक्षक स्था. गु. शाखा जळगाव श्री किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन श्री कैलास नागरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *