अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा कुविख्यात गुन्हेगार रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील हा अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा असुन
त्याचेवर या पुर्वी नंदुरबार जिआरपी (अमळनेर लोहमार्ग दुरक्षेत्र) येथे जबरी चोरी, लुटमारीचे, सरकारी नौकरावर हल्ला, खंडणी तसेच जिवानिशी ठार मारणे असे गुन्हे दाखल असुन तो सराईत
गुन्हेगार आहे. तसेच मिळालेल्या माहीतीवरुन तो चाकु सुरे ताब्यात बाळगुन रेल्वेतील प्रवास करणारे तृतीय पंथी याचेंवर त्याचे साथीदारासह दहशत करुन त्याचे कडुन जबरदस्तीने प्रत्येकी १०००/-रुपयाची हप्ता वसुली करणे, प्लेटफार्मवरती प्रवाश्याकडुन जबरीने पैसे हिसकावण्याचा सवईचा आहे.
त्याने दिनांक २०/१२/२०२२ रोजी रात्री ००/३० वा. अमळनेर शहरातील रेल्वे प्लेटफार्म वरती सचिन पाटील वय २२ रा. शिवशक्ती चौक यास चाकुने मारुन मोबाईल हिसकावुन नेला होता
बाबत फिर्याद वरुन त्याचे विरुध्ध नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जिवेठार मारण्याचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंद होता. सदर गुन्हयात तो वान्टेड होता.दिनांक २९/१२/२०२२ रोजी पो. नि. विजय शिंदे यानां मिळालेल्या गोपणीय बातमी नुसार
02/45 वाजता अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील मामाजी व्यायाम शाळा जवळ सार्वजनिक जागी आरोपी राहुल
उर्फ रामजाने पंढरीनाथ पाटील वय 25 रा. बंगाली फाईल अमळनेर ता. अमळनेर हा विना परवाना एक धार
पात्याचा अनुकुचीदार स्टिल चा मोठा चाकु हातात घेवुन दहशत माजवित असताना मिळुन आल्याने त्यास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोनि विजय शिंदे यानीं तसेच त्याचे पथकातील पोलीस अमंलदार यानीं जिवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने पकडले असुन त्याचे विरुध्द पोकाँ/ निलेश मोरे अमळनेर पोस्टे यानीं फिर्याद दिलेवरुन अमळनेर पोस्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 सह म.पो.का.क. 135 अन्वये गुन्हा दाखल झाला असुन रामजाने पाटील यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपीताचा अभिलेख पाहता तो नंदुरबार जिआरपी (अमळनेर रेल्वे दुरक्षेत्राचा) अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन
उपरोक्त नमुद गुन्हयाचा तपास पोहेकाँ कपिलदेव पाटील हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानीं स्वता समक्ष त्याचे पथकातील अमलदार पोउपनि श्री अनिल भुसारे, पोहेकाँ सुनिल हटकर, पोहेकाँ/ किशोर पाटील पोना रविंद्र अभिमन पाटील, पोना/ शरद पाटील, पोना/ दिपक माळी यानीं केली