मारवड येथील रेशन मालाची काळ्या बाजारी विक्री करण्याचे उददेशाने वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.

लाभार्थ्यांचा तोंडून घास हिसकवने पडले महागात..

मारवड.ता.अमळनेर :
पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष चिंतामण बावणे अमळनेर यांनी समक्ष मारवड पोलीस ठाण्यात हजर होवून फिर्याद की,
दिनांक 26.12.2022 रोजी मा. तहसिलदार सो. अमळनेर यांनीं
फोन करून कळविले कि, मारवड गांवी स्वस्त धान्य दुकान नंबर 105 व 106 मधून अवैधरित्या मालाची वाहतूक
करतांना एक वाहन मिळून आले असल्याने आपण सदर ठिकाणी जावून योग्य ती कायदेशीर कारवाई करा असे मौखिक कळविलेवरुन पूरवठा अधिकरि श्री बावणे साहेब सोबत मनोहर पुरुषोत्तम भावसार (तलाठी सजा मारवड), अनिल विनायक पाटील (गोदाम व्यवस्थापक) असे शासकिय वाहनाने मारवड येथे रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पोहचले असता सदर ठिकाणी मारवड गावातील नागरीक महेंद्र वसंतराव पाटील, रविंद्र यादवराव पाटील, जितेंद्र पांडूरंग पाटील, उमेश जिजाबराव सुर्वे असे हजर होते त्यावेळी सदर ठिकाणी अॅपे रिक्षा वाहन क्रं. GJ- 05 BV 4829 असे स्वस्त धान्य दुकान नंबर 105 व 106 च्या समोर प्रागंणात उभे होते तसेच सदर वाहनात अंदाजे 50 किलो प्रती गोणी प्रमाणे अशा 8 गोण्या स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ भरलेला दिसत होता त्यानंतर पुरवठा अधिकारी यांनी सदर दुकानाचे सेल्समन यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही तसेच गावातील एका व्यक्तीस त्यांचे घरी पाठविले असता ते घरी मिळून आले नाहीत त्यानंतर सदर वाहनावरील चालक यास नमुद इसमा समक्ष नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रशांत विजय पाटील वय 24 वर्षे रा. जैतपीर ता. अमळनेर असे सांगितले त्यावरुन सदरचे वाहन हे मारवड पोलीस स्टेशन येथे आणून लावण्यात आले तसेच सदरचे स्वस्त धान्य दुकान नंबर 105 व 106 हे मा तहसिलदार सो, अमळनेर यांचे मौखिक आदेशान्वये सिल करुन अपरात्र झाल्याने पुरवठा अधिकारी व त्यांचे पथक घरी निघून गेले. तदनंतर दिनांक 27/12/2022 रोजी पुन्हा मारवड येथे जावून स्वस्त धान्य दुकान नंबर 105 व 106 चे सेल्समन अनिल काशिनाथ साळुंके (पाटील) रा. मारवड ता. अमळनेर यांना बोलावून घेतले तसेच पंच नामे महेंद्र वसंतराव पाटील, रविंद्र यादवराव पाटील, उमेश भटू साळुंके, दिलीप शामराव साळुंके रा. मारवड ता. अमळनेर अशासमक्ष
सदर दुकानाचे सिल काढले असता नमुद दुकानातील अन्नधान्य साठा मोजमाप केला सदर दुकानात
खालीलप्रमाणे साठा उपलब्ध मिळून आला
1) गहू 84.00 क्विंटल
2) तांदूळ 141.30 क्विंटल
3) साखर 30.00 किलो
02.50 क्विंटल
4) मका
तसेच दिवाळी किट मधील अन्न धान्य साठा खालीलप्रमाणे
1) साखर 02.00 क्विंटल
2) रखा 70.00 किलो
3) दाळ 01.00 क्विंटल
4) तेल 70.00 किलो
वर प्रमाणे मंजूर केल्या प्रमाणे अन्न धान्य साठा उपलब्ध मिळून आला असून सदर स्वस्त धान्य दुकान नंबर 105 व 106 मधील अभिलेखाची पडताळणी करता खालील प्रमाणे अन्न धान्य साठयात अनियमितता दिसून आली आहे.
1) गहू (अंत्योदय, प्राधान्य आणि PMGKAY) 01.13 क्वि. कमी
2) तांदूळ (अंत्योदय, प्राधान्य आणि PMGKAY) 16.07 क्वि. जास्त
तसेच दिवाळी किट मधील अन्न धान्य साठा खालीलप्रमाणे
1) तेल 09.00 किलो जास्त
2) दाळ 39.00 किलो जास्त
3) साखर 01.39 क्वि. जास्त
4) रवा 09.00 किलो जास्त
याप्रमाणे सदर मालाची अनियमितता तसेच टंचाई दाखवून लाभार्थीना त्यांचा लाभ न देता दुकानाचा सेल्समन
अनिल काशिनाथ साळुंके रा. मारवड हा अॅपे रिक्षा वाहन क्रे. GJ- 05 BV 4829 वरील वाहन दुकान नंबर 105 व 106 मधील लाभार्थ्यांचा अन्न धान्य पुरवठ्याची खुल्या बाजारात बाजार भावाप्रमाणे विक्री करण्याचे उददेशाने वाहतूक करतांना साक्षीदारांना मिळून आला आहे म्हणून तहसिलदार सो, अमळनेर यांनी दिलेले लेखी आदेश क्र.पुरवठा/कावि/471/2022 दिनांक 28/12/2022 अन्वये पारित केल्याने पुरवठा अधिकारी श्री बावणे साहेब यांनी स्वस्त धान्य दुकान नंबर 105 व 106 मधील साठा रजिष्टर तसेच भेट रजिष्टर ताब्यात घेवून तसा अहवाल तयार करून समक्ष हजर केले असून (1) अनिल काशिनाथ साळुंके रा. मारवड ता. अमळनेर (2) प्रशांत विजय पाटील रा. जैतपीर ता. अमळनेर ( 3 )दिनेश वडर रा. मारवड ता. अमळनेर अशाविरुध्द कायदेशीर फिर्याद दिली असून मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील गुन्ह्याचा तपास
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राकेशसिंह परदेशी साहेब हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *