जळगाव शहरातील विविध समस्यावर आम आदमी पार्टी तर्फे म.न.पा.आयुक्त व महापौर यांना निवेदन..

जळगाव,,- प्रभाग क्रमांक 03. वार्ड क्रमांक 09.मोहन नगर येथील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली असून गटारी पूर्णपणे तुटलेले आहेत.संभाजीनगर ते मोहाडी रोड पर्यंत तयार करत असलेल्या रोडाची लेवल दीड फुटाणे वाढली असून वृंदावन गार्डन कडून जॉईन होणारा रोड हा चढतिचा असल्याकारणाने वाहनधारकांना अतिशय धोकादायक झालेला आहे या कारणास्तव नागरिकांना मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे रोडचे काम लवकरात लवकर तातडीने करावे सदर डांबरी रस्त्यावर योग्य पद्धतीने सुधारणा करून रस्ता मोकळा करून देण्यात यावा. व तुटलेल्या गटारीचे नवीन बांधकाम करण्यात यावे या संदर्भात आज जळगाव मनपा आयुक्त साहेब व महापौर मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळेस जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी या निवेदनाची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अन्यथा लोकसभागातून आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका मांडली. यावेळेस जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष.डॉ. अनुजा पाटील मॅडम.उपशहर प्रमुख.डॉ.नारायण आटकोरे- माधवराव जाधव.शहर संघटक प्रमुख.रत्नाकर खरोटे.जिल्हा मीडिया प्रमुख.योगेश भोई. तसेच प्रभाग 09 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]