बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीस अमळनेर पोलिसांनी केले अटक..

विना परवाना गावठी रिव्हालवर,चाकु,फायटर, दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकुण२७,८००/-रु.किंमतीचा ऐवज केला हस्तगत.

अंमळनेर शहरात दिनांक २७/१२/२०२२ रोजी पोलिस निरिक्षक श्री. विजय शिंदे यानां पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार संद्याकाळी ०७/१० वाजता अमळनेर शहरातील  पैलाड भागात अमळनेर ते चोपडा रोड लगत असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिर मध्ये संशयीत् आरोपी नामे अविनाश बाळु शिरसाठ वय२६ रा. वाडी बु. ता. शिरपुर जिल्हा धुळे हा विना परवाना एक गावठी बनावटीचे ६ बोरचे एक रिव्हालवर,चाकु,फायटर, दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकुण२७,८००/- रु. कि. चा एवज जवळ कब्जात बाळगुन मिळुन आल्याने त्याचे विरुध्द पोना. डॉ. शरद तुकाराम पाटील यानीं फिर्याद दिले वरुन अमळनेर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ सह म.पो.का.क. १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहेकाँ/ सुनिल पाटील हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यानीं स्वता समक्ष त्याचे पथकातील अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल हटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलिस नाईक दिपक माळी, पोलिस नाईक रविंद्र पाटील, पोलीस नाईक सिध्दांत बलवंत सिसोदे, पोलीस नाईक.डॉ.शरद पाटील यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *