साने गुरुजींच्या कर्मभूमीत स्मृतींना उजाळा…
जळगाव येथील अध्यापक विद्यालयाच्या डी.एड बॅच 1991-93 या वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. डी.एड. उत्तीर्ण होऊन तब्बल 28 वर्षांनंतर मागील वर्षी चाळीसगाव येथे सुरू करण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाची परंपरा कायम राखून सलग दुसऱ्या वर्षी एकत्र येत अमळनेर येथे दुसरे पुष्प गुंफण्यात आले.
सुरुवातीला जिल्हाभरातून आलेल्या सर्व शिक्षकांचे आयोजकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन अल्पोपहार देण्यात आला. त्यानंर मंगळग्रह मंदिर दर्शन, प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वाडी संस्थान येथील संत सखाराम महाराज समाधी व श्री विठ्ठल दर्शन, पाडळसरे धरण भेट, प्राचीन कपिलेश्वर मंदिर दर्शन तसेच कपिलेश्वर येथे निसर्गरम्य वातावरणात स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन संगमस्थळी असलेल्या पारावर एकत्र बसून नवीन-जुन्या वर्गमित्रांचा परिचय, वर्गातील गंमती-जमती व विविध कार्यक्रमांचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.
अमळनेर कर्मभूमी असलेल्या पूज्य साने गुरुजी यांच्या स्मृती जपाव्यात तसेच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व शिक्षकांनी काम करावे या भावनेने सर्वांना गुरुजींचा सुंदर फोटो व पुस्तक भेट देण्यात आले. याप्रसंगी स्व.परशुराम गांगुर्डे या वर्गमित्राला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढील वर्षी जळगाव येथे स्नेहमेळावा घेण्याबाबत तेथील मित्रांनी जाहीर केले.
स्नेह मेळाव्यास यांची होती उपस्थिती
किशोर अहिरराव, दत्तात्रय सोनवणे, विजय पाटील, महेश बोरसे, प्रदीप राजपूत (सर्व अमळनेर), सुनील पवार, सोमनाथ महाजन, राजेंद्र कोळी, अरुण चौधरी (सर्व जळगाव), गजानन वराडे, विकास वराडे, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर मगरे, मनोहर लोखंडे (सर्व जामनेर), सुनील पाटील, संजय बारी, हिरालाल मोतीराळे (सर्व चोपडा), सुनील पाटील (एरंडोल), ईश्वर बडगुजर, अशोक महाले, साहेबराव महाले, दत्तात्रय खैरनार, भाईदास सोमवंशी, विनोद पाटील, उत्तम अहिरे (सर्व पाचोरा), देविदास बोरसे, विलास सोनवणे, बापू चौधरी, संदीप बोरसे, धोंडीराम मोरे, मनोज वाघ (सर्व चाळीसगाव), ज्ञानेश्वर माळी (धरणगाव)
या स्नेहमेळाव्याचे आयोजन अमळनेर येथील वर्गमित्र दत्तात्रय सोनवणे, किशोर अहिरराव, विजय पाटील, महेश बोरसे, प्रदीप राजपूत या शिक्षकांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले.