मारवड रेशन दुकानाचा माल रात्री काळ्या बाजारात जात असतांना ग्रामस्थांनी पकडला.

पुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकान केले सील

अंमळनेर: मारवड तालुका अमळनेर येथील विकास सोसायटीचे रेशन दुकान क्रमांक 105 व 106 येथील दुकानातून आज। रात्री सेल्समन यांच्या सांगण्यावरून माल काळ्या बाजारात जात असताना येथील ग्रामस्थांनी गाडीत माल भरत पकडले त्यातील स्थानिक कर्मचारी याने कुलूप लावून पळ काढला मात्र गाडी मालक व तांदुळाच्या गोण्या व वजन काटा रंगेहात पकडला त्यांनतर ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल वाघ यांना माहिती लगेच फोनवर कळविले त्यानी रात्री 11 वाजेच्या सुमारास तालुका पुरवठा अधिकारी बावणे साहेब गोडवूनचे अनिल पाटील व मारवड तलाठी भावसार यांना पाठवून दिले सदर यांनी रेशन दुकान सील केले असून काळ्या बाजारात जाणारा मालाची गाडी मारवड पोलीस ठाण्यात जमा केली असून पुढील कार्यवाही पंचनामा करून करण्यात येणार आहे ✍️ सदरचे रेशन दुकान हे सोसायटीचे असून संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत होते का यावर नजर ठेवली जात नाही होती का आशा भोंगळ कारभाराला संचालक मंडळच जबादर आहे असेही ग्रामस्थांनी रात्री तीव्र बोलत होते एवढा भ्रष्ट प्रकार घडूनही मोजकेच संचालक रात्री याठिकाणी आले बाकी संचालकांनी येणे का टाळले यावरूननही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला तसेच रेशन दुकानाचे सेल्समन यांना महसुलाच्या अधिकाऱ्यांनी सम्पर्क केला असता त्यांनी मोबाईल कॉल रिसिव्ह करीत नाही असे बावणे साहेब व यांनी सांगितले सदर या कार्यवाही नंतर संचालक मंडळ काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष यावेळी मारवड येथील ग्रामस्थ रवींद्र पाटील महेंद्र पाटील जितेंद्र पाटील यांनी ही गाडी पकडून दिली त्यांनतर त्याठिकाणी रात्री 1 वाजेपर्यंत शेकडो ग्रामस्थांची गर्दी झाली होती महेश पाटील रावसाहेब पाटील गणेश पाटील संजय पाटील दिलीप पाटील उमेश सुर्वे यासह पोलिस प्रशासन हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *