दिनांक 23. 12. 2022. रोजी आम आदमी पार्टीने विधान भवन नागपूर येथे भव्य मोर्चा काढला मोर्चाचे विषय होते. 1.. महाराष्ट्रातील सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे…. मित्रहो हा विषय सुशिक्षित बेरोजगारांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता .वर्तमान स्थितीत सर्व प्रकारचे सुशिक्षित इंजिनियर पदवीधारक उच्च पदवीधारक हे नोकरी नसल्याने. नैराश्याचे जीवन जगत आहेत .उच्च शिक्षण घेऊनही एका हॉटेलचे शेपला जास्त पगार मिळतो परंतु या उच्चशिक्षित तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या तुलनेने पगार तर नाहीच .साधा रोजगार ही मिळत नाही .शासनाचे कर्तव्य आहे की त्यांच्याकडून लाखोचे फी घेऊन त्यांना शिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे .एवढेच नाही .तर ते शासनाचे कर्तव्य आहे .आज रोजगार नसल्याने लाखो युवक वैवाहिक जीवन जगण्यास अनुरूप असूनही केवळ त्यांना रोजगार नाही म्हणून त्यांच्या विवाह होत नाही .असे महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून हजारो युवक आहेत .केवळ त्यांना रोजगार नसल्याने लग्न जुळत नाही म्हणून हे उच्च शिक्षित तरुण नैराश्याचे जीवन जगत आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी शासनाने उपलब्ध करून द्याव्यात म्हणून ह्या मोर्चाचं आयोजन.2..शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी. व त्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव मिळावा म्हणून हा मोर्चा !आज बोटावर मोजण्या इतक्या उद्योजकांना लाखोंचे कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जाते. व अशा उद्योजकांनी कर्ज भरले नाही तर ते एनपीए .होऊन बँकांकडून माफ केले जाते. परंतु शेतकऱ्यांना किरकोळ गाजर दाखवून खुश केले जाते. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून हा भव्य मोर्चा काढला होता .परंतु यासरकारने हजारोंच्या संख्येने .मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसमोर निवेदन स्वीकारायला एकही मंत्री समोर आला नाही .ही अत्यंत खेदजनक बाब आहे! यांना गणपतीच्या मंडळांना भेटी द्यायला वेळ आहे बोगस कामांचे उद्घाटन करायला वेळ आहे? परंतु सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आलेल्या जनतेसमोर यायला वेळ नाही ?ही अत्यंत खेदजनक बाब आहे !शेतकऱ्यांच्या संबंधित व सुशिक्षित बेरोजगारांच्या संबंधित प्रश्न सोडवायला समोर यायला यांना वेळ नाही? ही लाजिरवाणी गोष्ट आहे .तेव्हा मी व माझ्यासारखे निराश झालेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी या शासनाच्या जाहीर निषेध करतो!
संतोष बाबुराव पाटील अध्यक्ष तालुका अमळनेर जिल्हा जळगाव